जाहिरात

Yavatmal News : सरकारी रुग्णालयात कुजलेला मृतदेह; चेहरा पाहून पत्नीचा आक्रोश; यवतमाळमध्ये संतापजनक प्रकार

यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या शवागारमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी पूर्णतः कुजल्याने मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

Yavatmal News : सरकारी रुग्णालयात कुजलेला मृतदेह; चेहरा पाहून पत्नीचा आक्रोश; यवतमाळमध्ये संतापजनक प्रकार

प्रतिक राठोड, प्रतिनिधी

Yavatmal News : यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या शवागारमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी पूर्णतः कुजल्याने मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. मनीष वाघमारे यांचा काल ७ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांना कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालयात नेलं. तिथून त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. रुग्णालयात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलं. तेथील कर्मचाऱ्यांनी मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला. 

मृतदेह कसा कुजला? 

आज शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार होता. मात्र फ्रिजरमधून मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्णतः कुजलेला होता. मृतदेहाची नीट ओळखही पटत नव्हती. मृतदेह ठेवताना तो बंद फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याने हा संतापजनक प्रकार घडला. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता, संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी रुग्णालय परिसरात वातावरण तणावपूर्ण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. 

नक्की वाचा - Akola News : मैत्रीत एका गोष्टीने केला घात; 3 तासांच्या पोलीस तपासानंतर मोठा बनाव उघड

रुग्णालय प्रशासनाकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान शवागारातील फ्रिझर बंद असल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कुठलेही उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले नाही. याप्रकरणी दोषींवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. 


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com