प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील एका हॉटेलमध्ये आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून आई गंभीर आहे. आईचे नाव जयंती तर मुलाचे नाव सुरज आहे. दोघेही बंगळुरूचे रहिवासी आहेत.
तरुणीच्या आत्महत्येनंतर पती अन् सासूनेही उचललं टोकाचं पाऊल...
सुरजचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होतं. गुरुवारी सुरजच्या पत्नीने आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप करत मृत तरुणीच्या नातेवाईकांनी बंगळुरू येथील स्थानिक पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं होते. दरम्यान बंगळुरूमध्ये आंदोलन सुरू असताना आई आणि मुलगा नागपुरात दाखल झाले होते.
Advertisement
दोघांनीही स्थानिक रॉयल विला हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. याच हॉटेलमध्ये दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.