Pune Crime : पुण्यात ताडी प्यायल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात केमिकल मिश्रित ताडी प्यायल्याने 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजय शेडगे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. गावात अनेक वर्षे अवैध ताडी आणि दारू विक्री सुरू असून पोलीस प्रशासनाला वेळोवेळी याची माहिती देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा महिलांसह गावकऱ्यांचा आरोप आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आतापर्यंत बिहार आणि उत्तर प्रदेशात बनावटी दारूमुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. या प्रकारानंतर गावातील महिलांनी आक्रमक होत गावातील ताडी विक्री केंद्र आणि अवैध दारूच्या दुकानांची तोडफोड केली. गावातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत.
नक्की वाचा - Jalgaon Crime : विवाह कार्यालयात बापाने मुलगी आणि जावयावर झाडल्या गोळ्या; जळगाव हादरलं!
आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये 4 ते 5 तरुणांचा जीव गेल्यानं अनेकांची कुटुंब उद्धस्त झाली आहेत. त्यामुळं महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट दुकानांची तोडफोड केली. यावेळी महिलांनी ताडी तयार करणाऱ्या दुकानातील बॅलर ओतून दिले. तसेच गावातील अवैध दारू विक्रीच्या दोन दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे.