जाहिरात

पार्टीसाठी कोंबडा दिला नाही म्हणून हत्या करुन जाळलं; चंद्रपुरातील घटनेने खळबळ

एखाद्या व्यक्तीच्या जीवापेक्षाही आणखी काय महत्त्वाचा असू शकतं? चंद्रपुरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पार्टीसाठी कोंबडा दिला नाही म्हणून हत्या करुन जाळलं; चंद्रपुरातील घटनेने खळबळ
चंद्रपूर:

एखाद्या व्यक्तीच्या जीवापेक्षाही आणखी काय महत्त्वाचा असू शकतं? चंद्रपुरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पार्टीसाठी कोंबडा दिला नाही म्हणून एका तरुणाचा खून करुन त्याला जाळून टाकल्याची धक्कादायक घटना बुधवारी (6 नोव्हेंबर 2024) दुपारी चामोर्शी तालुक्यातील येनापूर गावाजवळ उघडकीस आली आहे. मनोज आनंदराव मेकर्तीवार (32) असं मृत तरुणाने नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन राजेश्वर मेकर्तीवार, राहुल गुंजेकर यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

बुधवारी सचिन मेकर्तीवार व राहुल गुंजेकर हे मनोज मेकर्तीवार याच्या घरी गेले होते. दोघांनी त्याच्याकडे कोंबड्याची मागणी केली. कोंबडा न दिल्यास मारून टाकू, असंही त्यांनी धमकावले. यामुळे मनोज घरामागील आवारात जाऊन लपला. त्यानंतर दोघांनी मनोजला शंकर पुप्पलवार याच्या घरी नेऊन लोकांसमोर जबर मारहाण केली आणि मोटारसायकलवर बसवून त्याला येनापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने घेऊन गेले.

भाऊबीजेला बहिणीसोबत अघटित घडलं, रत्नागिरीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना

नक्की वाचा - भाऊबीजेला बहिणीसोबत अघटित घडलं, रत्नागिरीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुढे जंगलातील नाल्यात मनोजला ठार करुन त्याचा मृतदेह जाळला. सोमनपल्ली येथील संगीता येलगलवार यांच्या तक्रारीवरुन आष्टी पोलिसांनी सचिन मेकर्तीवार व राहुल गुंजेकर यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238, 3(5) अन्वये अटक केली आहे. पोलीस निरीक्षक विशाल काळे व उपनिरीक्षक मानकर घटनेचा तपास करीत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com