अझरुद्दीन शेख
धाराशीव लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 12 एप्रिलपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी अर्ज भरण्याचा मुहुर्त काही उमेदवारांनी काढला होता. त्यासाठी सर्व तयारी झाली होती. पण काहींच्या पदरी निराशा पडली आहे. त्यापैकी एक आहेत आर्यन शिंदे... शिंदे हे पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. पण वेळ चुकली आणि पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्याचे त्यांचे स्वप्न भंग झाले आहे.
आर्यन शिंदें बरोबर काय झालं?
राष्ट्रीय समाज दल ( आर ) या पक्षाकडून धाराशीव लोकसभेसाठी आर्यन शिंदे उमेदवारी दाखल करणार होते. तिसऱ्या टप्पात धाराशीवमध्ये मतदार होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार 12 एप्रिलपासून सुरूवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवारी दाखल करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी ते सर्व कागदपत्र घेवून सकाळी पोहोचले होते. अर्जातील संपूर्ण बाबीचा भरणा, शपथपत्र जोडून सर्व कागदांची पूर्तता, चलन भरणे या सर्वाबाबी त्यांनी पुर्ण केल्या. तो पर्यंत दुपारचे 2 वाजून 55 मिनिटे झाली होती. त्याच वेळी ते नामनिर्देशन कक्षात पोहोचले. मात्र उमेदवारी अर्ज स्विकारताना शपथ घ्यावी लागते. त्यासाठी ते पाच मिनिटे उशारा पोहोचले. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज स्विकारता आला नाही. आता हा अर्ज त्यांना सोमवारी दाखल करावा लागणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पहिला अर्ज दाखल करण्याचा त्यांचे स्पप्न मात्र भंग पावले.
हेही वाचा - स्टार प्रचारकांच्या यादीतून शिंदे- पवार बाहेर, भाजपने असे का केले?
धाराशीवमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना
धाराशीव लोकसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाने ओमराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवले आहे. तर ही जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहे. इथून राष्ट्रवादीने भाजप आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अर्चना पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना लगेचच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे दिरा विरोधात वहिनी असा सामना धाराशीवमध्ये रंगणार आहे.
हेही वाचा - बीडमध्ये ट्विस्ट! पंकजा मुंडें विरोधात ओबीसी मैदानात, भुजबळांचा पाठींबा कोणाला?