जाहिरात
This Article is From Apr 13, 2024

स्टार प्रचारकांच्या यादीतून शिंदे- पवार बाहेर, भाजपने असे का केले?

स्टार प्रचारकांच्या यादीतून शिंदे- पवार बाहेर, भाजपने असे का केले?
मुंबई:

भाजपला आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वगळावे लागले आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी स्टार प्रचारकांची सुधारीत यादी जाहीर केली. या यादीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे नाहीत. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही सुधारीत यादी सादर केली आहे. भाजपला असे का करावे लागले याचे कारण आता समोर आले आहे. 

शिंदे पवाराचे नाव का वगळले? 
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांची नावे होती. हे दोघेही त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. भाजप हा वेगळा पक्ष आहे असे असताना, त्यांच्या राज्याच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये त्यांची नावे कशी असा आक्षेप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला होता. त्याची दखल निवडणूक आयोगाला घ्यावी लागली. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर भाजपला आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिंदे आणि पवार यांची नावे वगळावी लागली. 

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण? 
भाजपने शिंदे आणि पवार यांना आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. त्यानंतर आत भाजपच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांचा समेवश आहे. आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक असतील तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील. 

राज्यात पाच टप्प्यात मतदान 
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल, 25 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे  असे पाच मतदान होणार आहे. तर 4 जुनला मतमोजणी होणार आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com