निवडणुकीत 4 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरातमधून सर्वाधिक, महाराष्ट्रातून किती?

देशात पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी हा आकडा 8,889 कोटी आहे. पुढील दोन टप्प्यात हा आकडा नऊ हजारांच्या पलीकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

20 मे 2024 रोजी देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना पैशांचे, दारूचे आमिष दिले जाते, यावर निवडणूक आयोगाची करडी नरज असून त्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मतदानादरम्यान निवडणूक आयोगाकडून देशातील विविध राज्यांमधून अवैध रोख, अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत निवडणूक आयोगाने 8,889 कोटींची जप्ती केली आहे. यातील तब्बल 45 टक्के ड्रग्ज आणि अमली पदार्थांचा समावेश आहे. यामध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये पंजाबच्या दुप्पट कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे ही मोठी धोक्याची घंटा आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 75 कोटी रुपयांचे रोख जप्त करण्यात आले असून 62 लाख 19 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत 49 कोटींपर्यंत आहे. याशिवाय 265 कोटी रुपयांचे ड्रग्ज, 188 कोटींचे दाग दागिने पकडले आहेत. 107 कोटींच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या असून एकूण 685 कोटींच्या कॅश, वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने आतापर्यंत केलेल्या कारवाईनुसार, देशातील एकूण कारवाईत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक आहे.

नक्की वाचा - Explainer : मतदानाच्या टक्केवारीचा वाद, 1.07 कोटी मते कशी वाढली?

मतदारांना आमिष देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. देशात पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी हा आकडा 8,889 कोटी आहे. पुढील दोन टप्प्यात हा आकडा नऊ हजारांच्या पलीकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा अडीच पट असल्याचं दिसून येतं. 

Advertisement
देशात सर्वाधिक जप्ती केलेली राज्य
क्रमांककॅशदारूड्रग्ज (किंमत)दाग-दागिनेइतरएकूण
1तेलंगणा - 114.1कर्नाटक  - 175.4गुजरात - 1,187.8 दिल्ली - 195 राजस्थान - 756.8 गुजरात - 1,461.7
2कर्नाटक - 92.6पश्चिम बंगाल - 90.4 पंजाब - 665.7महाराष्ट्र - 188.2मध्य प्रदेश - 77.5राजस्थान - 1,133.8
3दिल्ली - 90.8तेलंगणा - 76.3 दिल्ली - 358.4आंध्रप्रदेश - 142.6 कर्नाटक - 162पंजाब - 734.5
4आंध्रप्रदेश - 85.3 उत्तर प्रदेश - 53.6 तमिळनाडू - 330.9गुजरात - 128.6पश्चिम बंगाल - 149.5महाराष्ट्र - 685.8
5महाराष्ट्र - 75.5महाराष्ट्र - 49.2महाराष्ट्र - 265.5तमिळनाडू - 99.9 ओडिसा - 113दिल्ली - 653.3
सर्व राज्य/UT849.2814.93,9581,260.32,006.68,889.7

वरील आकडेवारीवरुन लक्षात येईल, की या निवडणुकीत सर्वाधिक ड्रग्जची जप्ती करण्यात आली आहे. गुजरातमधून 1,187.8 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्यानंतर पंजाबमधून 665.7 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.