Ahilyanagar Municipal Corporation Election 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. सर्वाधिक महानगरपालिकेत भाजपची सरशी केली आहे. काही महानगरपालिका वगळता बाकी सर्व पालिकेवर महायुतीची सत्ता आहे. अहिल्यानगरमध्येही महायुतीचे मोठं यश संपादन केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अहिल्यानगरमध्ये काँग्रेस २, ठाकरे गट एक जागा आघाडीवर आहे. त्याशिवाय अजित पवार गटाला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर भाजप २५ जागा, शिंदेंची शिवसेना १० जागांवर आघाडीवर आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार गटाला विक्रमी यश मिळालं आहे. अहिल्यानगर महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी युतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सर्वत्र जल्लोष केला जात आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वावं विजय खेचून आणल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. नगरपरिषद, महापालिका आता पुढे जिल्हा परिषदेत गुलाल आपलाच असणार असल्याचा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - Maharashtra Election 2026 : राज्यभरात जिंकले! पण भाजपला 'या' महापालिकेत अवघ्या 2 जागा; कोणी रोखलं?
अहिल्यानगर महापालिका प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 1
सागर बोरुडे (अजित पवार राष्ट्रवादी),
दीपाली बारस्कार (अजित पवार राष्ट्रवादी),
संपत बारस्कर (अजित पवार राष्ट्रवादी),
शारदा ढवण (भाजप).
प्रभाग क्रमांक 2
निखील वारे (भाजप),
रोशनी त्र्यंबके (भाजप),
बाळासाहेब पवार (अजित पवार राष्ट्रवादी),
महेश तवले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 3
योगीराज गाडे (शिवसेना ठाकरे पक्ष),
गौरी बोरकर (सोही) (अजित पवार राष्ट्रवादी),
ऋग्वेद गंधे (भाजप)
ज्योती गाडे , (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 4
खान मीनाज (काँग्रेस),
शम्स खान (काँग्रेस),
शहेबाज शेख (AIMIM),
सय्यद शहाबाज (AIMIM)
प्रभाग क्रमांक 5
धनंजय जाधव (भाजप),
हरप्रीत गंभीर (अजित पवार राष्ट्रवादी),
मोहीत पंजाबी (अजित पवार राष्ट्रवादी),
काजल भोसले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 6
मनोज दुल्लम (भाजप),
सोनाबाई शिंदे (भाजप),
करण कराळे (भाजप)
सुनीता कुलकर्णी (भाजप)
प्रभाग क्रमांक 7
पुष्पा बोरुडे (भाजप, बिनविरोध),
बाबासाहेब वाकळे (भाजप),
वंदना ताठे (भाजप),
वर्षा सानप (भाजप)
प्रभाग क्रमांक 8
कुमारसिंह वाकळे (अजित पवार राष्ट्रवादी),
सुनिता भिंगारदिवे (अजित पवार राष्ट्रवादी),
नवनाथ कातोरे (धनुष्यबाण),
आशा कातोरे (भाजप)
प्रभाग क्रमांक 9
संजय शेंडगे (धनुष्यबाण),
रुपाली दातरंगे (धनुष्यबाण),
वैशाली नळकांडे (धनुष्यबाण),
महेश लोंढे (भाजप)
प्रभाग क्रमांक 10
श्रीपाद छिंदम (बसपा),
सागर मुर्तडकर (भाजप),
मुयरी जाधव (भाजप),
शीतल ढोणे (भाजप)
प्रभाग क्रमांक 11
गणेश कवडे (धनुष्यबाण),
सुनीता गेनप्पा (धनुष्यबाण),
आशा डागवाले (अजित पवार राष्ट्रवादी)
सुभाष लोंढे (भाजप)
प्रभाग क्रमांक 12
बाळासाहेब बोराटे (धनुष्यबाण),
दत्ता कावरे (धनुष्यबाण),
मंगल लोखंडे (धनुष्यबाण),
सुरेखा कदम (धनुष्यबाण)
प्रभाग क्रमांक 13
अविनाश घुले (अजित पवार राष्ट्रवादी),
सुरेश बनसोडे (अजित पवार राष्ट्रवादी),
सुजाता पडोळे (अजित पवार राष्ट्रवादी)
अनिता शेटिया (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 14
प्रकाश भागानगरे (अजित पवार राष्ट्रवादी बिनविरोध), सुनीता फुलसौंदर (अजित पवार राष्ट्रवादी),
वीणा चोपडा (अजित पवार राष्ट्रवादी)
गणेश भोसले (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 15
सुजय मोहिते (भाजप),
दत्ता गाडळकर (भाजप),
गीतांजली काळे (अजित पवार घड्याळ),
पौर्णिमा गव्हाळे (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 16
ज्ञानेश्वर येवले (भाजप),
विजय पठारे (भाजप),
सविता कांबळे (अजित पवार राष्ट्रवादी)
वर्षा काकडे (अजित पवार राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 17
मनोज कोतकर (भाजप),
कमल कोतकर (भाजप),
अश्विनी लोंढे (अजित पवार राष्ट्रवादी)
मयूर बांगरे (अजित पवार राष्ट्रवादी)