Ambernath Municipal Council : अंबरनाथमधील सभेदरम्यान मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथकरांना मेट्रो आणणार असल्याची आनंदी बातमी दिली. वाहतूक कोंडीतून सुटका आणि वेगवान प्रवासासाठी ही मेट्रो मैलाचा दगड ठरेल असे त्यांनी सांगितले होतं. त्यानंतर काही दिवसात मतदारांनी अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष देत मोठी बातमी दिली आहे.
अंबरनाथ शहरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट सामना झाला. शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा वाडेकर, तर भाजपकडून तेजश्री करंजुळे यांच्यात अटीतटीची लढत झाली,या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता,अंबरनाथ नगरपरिषदेत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभा झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
अखेर अंबरनाथच्या मतदारांनी भाजपा उमेदवार तेजश्री करंजुले यांना कौल देत नगराध्यक्ष पदावर मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे, दरम्यान या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, शहरात जल्लोष साजरा केला जात आहे..
35 वर्षांची शिवसेनेची सत्ता भेदली...
अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष पदासह 60 जागांसाठी निवडणूक पार पडली. अंबरनाथमध्ये ३५ वर्षे शिवसेनेने सत्ता होती. त्याला छेद देत अंबरनाथमध्ये पहिल्यांदा भाजप सत्तेत आली आहे. अंबरनाथमध्ये भाकरी फिरवली असून पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाला आहे. अंबरनाथच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तेजश्री करंजुले निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांना शिवसेना शिंदे सेनेच्या मनिषा वाळेकर यांचं आव्हान होतं. मात्र तेजश्री करंजुले 43224 मतांनी विजयी झाल्या आहेत.
अंबरनाथमध्ये मतदानावेळी राडा...
अंबरनाथ नगरपरिषदेच्या मतदानावेळी अनेक ठिकाणी राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पॅनल क्रमांक 5 मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उमेदवार शैलेश भोईर आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केला होताय या आरोपांनंतर कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला.मतदानाच्या आदल्या रात्री पॅनल क्रमांक 28 मध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन व्यक्तींना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावा केला. त्यांना निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या ताब्यात दिले. हे दोन्ही व्यक्ती भाजपचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात होते. कोहजगाव परिसरातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये 208 महिला जमल्याची माहिती मिळताच काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी तिथे धाव घेतली. या महिलांना मुंब्रा, भिवंडी आणि मालेगाव येथून बोगस मतदानासाठी आणल्याचा गंभीर आरोप भाजप आणि काँग्रेसने शिवसेना शिंदे गटावर केला.
काँग्रेसची मोठी झेप...
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपसह काँग्रेसची मोठी झेप पाहायला मिळाली. यंदा काँग्रेसचे तब्बल १२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे विदर्भासह अंबरनाथमध्येही काँग्रेसचा मोठा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे १२, भाजपचे ११, शिंदेंच्या शिवसेनेचे २२, अजित पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले आहेत.
अंबरनाथ नगरपरिषदेतील एकूण विजयी नगरसेवक (५९)
भाजप 11 विजयी
- स्वप्नना गायकवाड
- मीना वाळेकर
- भाजप उमेदवार विजयी
- रंजना कोतेकर
- मनीष गुंजाळ
- अभिजीत करंजुले
- जयश्री थर्टी
- अनिता भोईर
- सुजाता भोईर
- सचिन गुंजाळ
- सुप्रिया आतिष पाटील
शिवसेना 22 विजयी
- विजयी शिंदे
- रेश्मा गुडेकर
- राहुल सोमेश्वर
- निखिल चौधरी
- ज्योत्सना भोईर
- कुणाल भोईर
- अपर्णा भोईर
- पल्लवी लकडे
- विकास सोमेश्वर
- स्वप्निल बागुल
- पुरुषोत्तम उगले
- संदीप भराडे
- कल्पना गोरे
- रोहिणी भोईर
- संदीप तेलंगे
- अजय मोहिरीकर
- सचिन मंचेकर
- रेश्मा सुर्वे
- सुनिता बागुल
- रवींद्र करंजुले
- दीपक गायकवाड
- रवी पाटील
अजित पवार गट 4 विजयी
सदाशिव पाटील
मीरा शेलार
सचिन पाटील
सुनिता पाटील
काँग्रेस 12
दर्शना पाटील
अर्चना पाटील
हर्षदा पाटील
तेजस्विनी पाटील
प्रदीप पाटील
विपुल पाटील
कबीर गायकवाड
मनीष म्हात्रे
धनलक्ष्मी जयशंकर
संजवणी देवडे
दिनेश गायकवाड
किरण राठोड
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
