केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीटीव्हीचे एडिटर इन चीफ संजय पुगलिया यांना दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षात काय कामं केली? शिवाय येणाऱ्या 25 वर्षाचा रोडमॅप काय असेल हेही स्पष्ट केले. 2047 पर्यंत भारत कसा असेल हेही त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केला. या मुलाखतीत त्यांनी गेल्या दहा वर्षात सरकारने पायाभूत सुविधांपासून ते मार्केटपर्यंत आणि स्टार्टअपला महत्व दिले आहे. त्यासाठी महत्वाची पावलं उचलली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अर्थव्यवस्था कशी सुधारली?
अर्थव्यवस्था सुधारण्यावर या मुलाखतीत अमित शाह यांनी स्पष्ट भूमीका मांडली. त्यांनी सांगितले की 2014 ते 2024 पर्यंत मोदींनी स्पष्ट आर्थिक धोरण तयार केले. या दहा वर्षात महागाई असो, तुटीचा अर्थसंकल्प असो, पायाभूत सुविधांवर केला जाणारा खर्च असो या गोष्टी योग्य मार्गाने नेण्यास आम्हाला यश आले आहे. त्यामुळेच शेअर बाजाराची स्थिती आणि लोकांचा विश्वास वाढल्याचा दावा अमित शाह यांनी केला आहे.
10 वर्षात भारताची ताकद वाढली
गेल्या दहा वर्षात भारताची ताकद वाढली आहे. निर्मिती क्षेत्राचे हब भारत बनले आहे. त्यासाठी धोरणं आखली गेली. शिवाय त्याची अंमलबजावणीही केली गेली असेही ते म्हणाले. जे क्षेत्र वाढत आहे त्यात भारताचा हिस्सा मोठा असावा यासाठी प्रयत्न होत आहे. त्यात ग्रीन हाइड्रोजन, इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी, इथेनॉल अशा क्षेत्रांचा समावेश आहे. येणाऱ्या 20 वर्षात हीच क्षेत्र जागतिक अर्थव्यवस्थेला चालवणार असल्याचेही ते म्हणाले. त्याचा फायदा पुढील 25 वर्षे भारताला होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही वर्षात काही क्षेत्रात आपण मागे पडलो होतो. त्यात संरक्षण असेल किंवा अंतराळ असेल या क्षेत्रात आपण मागे होते. पण त्यातही आता भारताने मुसंडी मारल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - रेमल चक्रीवादळाचा कहर, आतापर्यंत 46 जणांनी जीव गमावला
सर्व इमर्जिंग सेक्टरमध्ये भारत पुढे
पुढच्या 25 वर्षात अर्थकारणाला जे क्षेत्र प्रवाभित करणार आहेत अशा सर्व सेक्टरमध्ये भारत आज पुढे असल्याचा दिसतोय असेही या मुलाखतीत शाह यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने जीडीपीला ह्युमन टच देण्याचा प्रयत्न केला आहे. जर आम्ही 14 करोड शौचालय बनवतो त्यावेळी जीडीपी वाढणार हे निश्चित आहे. पण त्यामुळे 14 करोड लोकांचा सन्मानही राखला जातो हेही तितकेच खरे आहे. 10 करोड लोकांच्या घरात आज गॅस सिलेंडर जातो. त्यामुळे धुरमुक्त वातावरण होते. त्याचा 50 कोटी लोकांच्या आरोग्याला मदत होते असेही ते म्हणाले.
आम्ही विकासाच्या दिशेने
स्वच्छ पाणी 14 करोड कुटुंबापर्यंत पोहोचत आहे. त्याचा परिणाम जीडीपीवर होणार पण त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहीले. त्यादृष्टीने सरकारने काम केले आहे. जनतेचा त्रास कमी व्हावा अशी सरकारची इच्छा आहे. कुपोषणाबरोबर लढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य मोफत देण्याचे काम सरकारने केले आहे. शिवाय 4 करोड घर बनवले आहेत. पुढच्या काळात 3 करोड घर बनवले जाणार आहेत. एक प्रकारे आम्ही भारताला विकासाच्या दिशेने घेवून जात आहोत. असेही ते म्हणाले.
आता वेगावर भर देणार
देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे. आता त्याचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. व्यापार, शेअर बाजार, त्यासाठी लागणारे मुक्त वातावरण यासर्व गोष्टींचा वेग वाढवायचा आहे. आमच्या सरकार गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 11 स्थानावरून 5 व्या स्थानावर आणली आहे. आता हीच अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आणण्याचा आमचा निर्धार आहे.