रेमल चक्रीवादळाने इशान्य भारतात सध्या कहर केला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 46 जणांना आपला जीव गमवाला लागला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मिझोरमला बसला आहे. इथे 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 10 जण बेपत्ता आहेत. तर मेल्थमइथे दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर आसाम मध्ये चार जणांनी या चक्रीवादळाने जीव घेतला आहे. काही जण जखमी आहेत.
रेमल चक्रीवादळात ज्यांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना मिझोराम सरकारने चार लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. शिवाय आज ( बुधवारी ) शाळा ठेवण्याची घोषणा केली आहे. चक्रीवादळामुळे अरूणाचल प्रदेश आणि आसाममध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इम्फाळमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीवादळामुळे आसाम आणि त्रिपुरातील वीज खंडीत झाली आहे. शिवाय इंटरनेट सेवाही बंद पडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेमल चक्रीवादळामुळे काय काय झालं?
-आसामच्या नऊ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
-आसामच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली
-खराब वातावरण आणि भूस्खलन यामुळे दळणवळणावर परिणाम
-लोकांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यास अडचणी येत आहेत
-मुसळधार पावसामुळे नागालँडचा दोयांग धरण ओव्हरफ्लो झालं आहे
-मेघालयमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे
-मेघालयच्या सगारो हिल्स क्षेत्रात 200 पेक्षा जास्त घरांचे नुकसान
रेमल चक्रीवादळामुळे वाईट स्थिती
आसाममध्ये आलेल्या रेमल चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण जखमी झाले आहेत. कामरूप जिल्ह्यात एका ठिकाणी घरावर झाड कोसळले. त्यात एका 19 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. त्यात त्याचे वडीलही जखमी झाले आहेत. शिवाय एका 60 वर्षाच्या महिलेवरही झाड कोसळले. तिला जखमी असस्थेत गुवाहाटीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रूग्णालयात दाखल होताच तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा - सामूहिक हत्याकांडाने देश हादरला! तरुणाने कुटुंबातील 8 जणांची केली हत्या अन् स्वत:ही...
चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा
चक्रीवादळामुळे जोरदार हवा वाहात आहे. त्यामुळे गुवाहाटीसह राज्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे आसामच्या काही भागात वीज गायब आहे. तर काही शहरांत पाणी भरले आहे. आयएमडीने चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world