'... त्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता' ठाकरे ठाकरेंवर भडकले

विधानसभेच्या मोहिमेची सुरूवात अमित ठाकरे यांनी वरळीतून केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र लोकसभेत महायुतीने सपाटून मार खालला. त्यानंतर मनसेने पुन्हा एकदा एकला चलो रे ची भूमीका घेतलेली दिसते. त्यानुसार आता विधानसभेची तयारी मनसेने सुरू केली आहे. त्यासाठी अमित ठाकरे यांनी धुरा सांभाळली आहे. त्यांनी विधानसभेची तयारीही वरळी मतदार संघातून केली आहे. याच मतदार संघातून आदित्य ठाकरे हे विधानसभेवर निवडून गेले आहे. विधानसभेच्या मोहिमेची सुरूवात अमित ठाकरे यांनी वरळीतून केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे 

वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे विधानसभेवर निवडून गेले होते. या मतदार संघात आता मनसेने तयारी सुरू केली आहे. पक्षाने संदिप देशपांडे यांना या मतदार संघातून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी मतदार संघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवाय मनसेच्या विधानसभा अभियानाची सुरूवातही वरळी विधानसभा मतदार संघातून केली आहे. त्यासाठी अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. अमित ठाकरे यांनी वरळी मतदार संघात जावू कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. शिवाय स्थानिकां बरोबर चर्चाही केली. 

ट्रेंडिंग बातमी - शिवसेना- भाजप वाद पेटला? कदमांच्या आरोपांना भाजपचे थेट उत्तर

अमित ठाकरे भडकले 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आदित्य हे विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.मात्र गेल्या पाच वर्षात त्यांनी या मतदार संघात काहीच केले नाही असा थेट आरोप त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात काही करता आले नाही ते तीन महिन्यात काय करणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते मतदार संघात फिरलेही नाहीत. कोळी वाड्याचे प्रश्न आजही तसेच आहे. या साठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता असा टोलाही अमित यांनी आदित्य यांना लगावला. 

ट्रेंडिंग बातमी - महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले

बिनशर्त पाठिंब्यावरून टोलेबाजी 

वरळी विधानसभा मतदार संघात मनसेने आदित्य ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता याची आठवण अमित ठाकरे यांनी करून दिली. त्यावेळी दिलेला बिनशर्त पाठिंबा घेतला. तो त्यांना चालला.त्यावेळी त्यांना काही वाटलं नाही. आमच्या पाठिंब्यावर मुलाला त्यांनी आमदारही केले. असे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेत अमित ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. या मतदार संघात काहीच कामे झाली नाहीत असेही ते म्हणाले. राज ठाकरेंनी स्वत:च्या हिंमतीवर पक्ष उभा केला आहे असेही ते म्हणाले. दरम्यान विधानसभेच्या मोहिमेची सुरूवात वरळीतून करत असल्याचे अमित म्हणाले.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - नवनिर्वाचित खासदाराच्या भावाचा प्रताप,अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण

मनसेची 200 पेक्षा जास्त जागांवर तयारी

मनसे विधानसभेच्या दोनशे पेक्षा जास्त जागांवर लढण्याची तयारी करत आहे. मनसे महायुतीत निवडणूक लढणार की स्वबळावर लढणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. असे असले तरी मनसेने आपली तयारी सुरू केली आहे. प्रत्येक मतदार संघाचा आढावाही घेतला जात आहे. शिवाय मुंबईतल्या तीन मतदार संघात उमेदवार कोण असणार याचेही संकेत दिले आहेत. त्यानुसार बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई, संदिप देशपांडे हे कामाला लागले आहेत.  

Advertisement
Topics mentioned in this article