दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार?

लोकसभा निवडणुकीत सुरू असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

25 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला असून 1 जूनला सातव्या टप्प्यातील आठ राज्यं आणि 57 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर चार जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुरू असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे पक्षांकडून याची तयारीही सुरू झाली आहे. 

26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. तर 3 नोव्हेंबरपर्यंत हरियाणाची मुदत संपत आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडून निकाल येणं अपेक्षित आहे. त्यात दोन्ही राज्यांच्या विधानसभेची मुदत 23 दिवसांच्या अंतराने असल्याने दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  2009 पासून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची निवडणूक एकाच वेळी होत असते. 

यंदा 29 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर या कालवधीत दिवाळी आहे. मात्र सणाच्या दिवसात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घेण्यास बराच अवधी असला तरी हरियाणाची निवडणूक आधी असल्याकारणाने दोन्ही राज्यांच्या निवडणुकात एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात 21 ते 26 ऑक्टोबरच्या जवळपास राज्यात मतदान होऊ शकेल. 

नक्की वाचा - अखेर निवडणूक आयोगाकडून मतदानाची आकडेवारी जाहीर; सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशानंतर निर्णय

विधानसभा तयारीसाठी अजित पवार गटाची बैठक
मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यस्तरीय बैठक होत आहे. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा तसेच पुढील काळात विधानसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आजची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित या बैठकीला प्रफुल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे यासह सर्व मंत्री आमदार राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

Advertisement