जाहिरात
This Article is From May 26, 2024

अखेर निवडणूक आयोगाकडून मतदानाची आकडेवारी जाहीर; सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशानंतर निर्णय

अखेर निवडणूक आयोगाकडून मतदानाची आकडेवारी जाहीर; सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशानंतर निर्णय
मुंबई:

विरोधी पक्ष आणि काही संस्थांनी संशय व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यातील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे... 

एका एनजीओने लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या टक्केवारीची आकडवारी त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. याशिवाय विरोधकांकडूनही निवडणूक आयोगावर आरोप-प्रत्यारोप केले जात होते. सुरुवातील निवडणूक आयोगाने फॉर्म 17C ला सार्वजनिक करण्याच्या मागणीला विरोध केला होता. मात्र शनिवारी, 25 मे रोजी निवडणूक आयोगाकडून पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे.  

या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमुरमध्ये सर्वाधिक 71.88 % मतदार पार पडलं आहे. तर सर्वात कमी मतदान मुंबई दक्षिणमध्ये 50.06 टक्के इतके झाले आहे. 

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील अपडेटेड मतदानाची आकडेवारी - 
 

क्रमांकमतदारसंघएकूण मतदारांची संख्यामतांची टक्केवारीमतदानाचा आकडा 
1 - पहिला टप्पाभंडारा गोंदिया182718867.04 % 1224928
 
2चंद्रपूर 183790667.55 %1241574
3गडचिरोली-चिमूर 
 
161720771.88 %1162476
4नागपूर  
 
222328154.32 %1207738
5रामटेक 
 
222328161.01 %1250190
6 - दुसरा टप्पाअकोला189081461.79 %1168366
अमरावती 183607863.67 %1169121
बुलढाणा178270062.03 %1105761
9हिंगोली181773463.54 %1154958 
10नांदेड 185184360.94 %1128564
11परभणी212305662.26 %1321868 
12वर्धा168277164.85 %1091351
13यवतमाळ-वाशिम 194091662.87 %1220189
14 - तिसरा टप्पालातूर197704262.59 %1237355
15सांगली186817462.27 %1163353
16बारामती237266859.50 %1411621
17हातकणंगले181427771.11 %1290073
18कोल्हापूर193640371.59 %1386230
19माढा199145463.65 %1267530
20उस्मानाबाद (धाराशिव)

1992737

63.88 %1272969
21रायगड166837260.51 %1009567
22रत्नागिरी -सिंधुदुर्ग145163062.52 %907618
23सातारा188974063.16 %1193492
24सोलापूर203011959.19 %1201586
25 - चौथा टप्पानंदुरबार 197032770.68 %1392635
26जळगाव 199404658.47 %1165968
27रावेर182175064.28 %1170944
28जालना196757469.18 %1361226
29औरंगाबाद205971063.03 %1298227
30मावळ2585018  54.87 %1418439
31पुणे197032770.68 %1392635
32शिरूर253970254.16 %1375593
33अहमदनगर198186666.61 %1320168
34शिर्डी167733563.03 %1057298
35बीड214254770.92 %1519526
36 - पाचवा टप्पा

धुळे

202206160.21 %1217523
37दिंडोरी185338766.75 %1237180
38नाशिक203012460.75 %1233379
39पालघर214851463.91 %1373162
40भिवंडी208724459.89  %1250090
41कल्याण208222150.12 %1043610
42ठाणे250737252.09 %1306194
43मुंबई उत्तर181194257.02 %1033241
44मुंबई उत्तर पश्चिम173508854.84 %951580
45मुंबई उत्तर पूर्व163689056.37 %922760
46मुंबई उत्तर मध्य174412851.98 %906530
47मुंबई दक्षिण मध्य147440553.60 %790339
48मुंबई दक्षिण153616850.06 %769010

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आधार मिळाल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे निवडणूक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com