रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Municipal Corporation Election : ठाणे मनपा निवडणुकीत एक रिक्षावाला नगरसेवक झाला आहे. मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३० मधून या रिक्षावाल्याने निवडणूक लढवली होती. MIM पक्षाने या रिक्षावाल्याला निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. नफीस अन्सारी असं या नगरसेवकाचे नाव असून मुंब्रा परिसरात रिक्षा चालवून संसाराचा गाडा हा नगरसेवक हाकतो.
MIM पक्षाने संधी दिली अन् मी सोनं केलं...
आपण नगरसेवक होऊ हा विश्वास होता. कारण रिक्षा चालवताना वॅार्डात झालेली चुकीचे कामे आणि नागरिकांच्या समस्या यांचा रोज सामना करत असताना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी काय करेन हे लोकांना समजावून सांगत होतो. मी आधी पासूनच प्रचार सुरू केला होता आणि मला MIM पक्षाने संधी दिली त्या संधीचे मी सोनं केलं.
दुसऱ्याच प्रयत्नात बनला नगरसेवक...
नफीस अंसारी यांनी या आधी देखील आपले नशीब आजमावले होते. पण तेव्हा त्यांना अपयश आले. मात्र ते खचून गेले नाही आणि गेली अनेक वर्षे त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला. त्याचा परिणाम म्हणजे यंदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. फेरीवाले समस्या, स्वच्छ पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षित जमिनी मुक्त करण्याची कामे मी करणार असं यावेळेस त्यांनी सांगितलं. त्यांनी प्रचारा दरम्यान देखील रिक्षा चालवून प्रचार केला. दिवसा प्रचार आणि रात्री रिक्षा चालवून कुटुंबाच्या गरजा त्यांनी पूर्ण केल्या आहेत.