अमरावतीत वातावरण तापलं, अमित शाहांच्या सभेवरुन बच्चू कडू आक्रमक

निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काही फायदा होणार नसल्याचं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू अमित शाह यांच्या सभेवरुन आक्रमक झाले आहे. प्रहार पक्षाकडून अमरावतीतील सायन्स कोर मैदान 23 आणि 24 एप्रिलसाठी आरक्षित करण्यात आलं होतं. मात्र उद्या अमित शाह यांची याच मैदानावर सभा आयोजित करण्यात आली असल्याने बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला. 

सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह येतात तेव्हा चोवीस तासांपासून सुरक्षा व्यवस्था कामाला लागते. मात्र बच्चू कडू यांनी यावर संताप व्यक्त केला. यावेळी बच्चू कडूंनी सायन्स कोर मैदानावर ठिय्या मांडला आहे. 

Advertisement

नेमकं काय घडलं?  
मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडूंनी 5 एप्रिल रोजी मैदानासाठी अर्ज केला होता. त्यानंतर 7 आणि 12 तारखेला अर्ज करण्यात आला होता. 21 आणि 22 तारखेला नवनीत राणा यांच्या सभेला परवानगी मिळाली होती. त्यानंतर 23 आणि 24 तारखेला बच्चू कडू यांच्या पक्षाचे उमेदवार दिशेन बूब यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी अमित शहा यांच्या सभेचं कारण सांगत बच्चू कडू यांच्या पक्षाची सभा नाकारण्यात आली. गृहमंत्री अमित शाह उद्या 24 एप्रिलला अमरावतीत सायन्सकोर मैदानात सभा घेणार आहेत. मात्र सुरक्षेसाठी 23 तारखेलाही येथे सभा घेण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काही फायदा होणार नसल्याचं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. 

Advertisement

कशी असेल अमरावतीत लढत?
अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीतून भाजपच्या नवनीत राणा निवडणूक लढवणार आहे, याशिवाय वंचितचे आनंदराज आंबेडकर या जागेवरुन निवडणूक लढवणार आहे. बळवंत वानखेडे यांची महाविकास आघाडीतून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. 

Advertisement