निवडणूक महाराष्ट्राची पडसाद उत्तर प्रदेशात, राम जन्मभूमीत काय झालं?

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदें समोर फारसे पर्याय शिल्लक राहीलेले नाहीत असंही बोललं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अयोध्या:

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. राज्यात महायुतीला प्रचंड बहुमतही मिळालं आहे. महायुतीचं सरकारही स्थापन होणार आहे. पण अजूनही मुख्यमंत्री कोण? यावर घोडं अडलं आहे. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोण? याबाबत महाराष्ट्रातल्या जनतेला उत्सुकता आहे. पण तशीच उत्सुकता उत्तर प्रदेशातही आहे. त्यामुळेच थेट उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत मुख्यमंत्रिपदाबाबत बॅनर झळकले आहेत. हे बॅनर संपूर्ण अयोध्या शहरात लावण्यात आले आहे. शिवाय हे अयोध्येच्या नागरिकांनी लावले असल्याचे बॅनरवर लिहीण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे अयोध्येला गेले होते. तिथे त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले होते. त्यामुळे अयोध्ये बरोबर शिंदेंचे एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या समर्थनासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनरवर अयोध्या वासियोंकी है पुकार,एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री बने फिर एक बार असा मजकूर त्यावर लिहीण्यात आला आहे. ही मागणी समस्त अयोध्यावासी यांनी केल्याचं ही म्हटलं आहे. अशा स्वरूपाचे बॅनर सध्या अयोध्या शहरात दिसत आहेत. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच मोदी, शहा,योगी आदित्यनाथ यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो झळकत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?

महायुतीला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रिपदाबाबतचा पेच काही सुटताना दिसत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यांनी आपला दावा अजूनही सोडलेला नाही. तर यावेळी त्यागाच्या भूमीकेत भाजप नाही. 132 आमदार आल्याने मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदेंसाठी आता काय करायचे असा प्रश्न आहे. शिंदेंना उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर देण्यात आली आहे. पण सद्य स्थितीत ते ती ऑफर स्विकारणार का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे शिंदे काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - सर्वात मोठा पक्ष मात्र शिंदेंवर भिस्त, भाजपसाठी एकनाथ शिंदे का महत्त्वाचे?

त्यात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदें समोर फारसे पर्याय शिल्लक राहीलेले नाहीत असंही बोललं जात आहे. सत्तेत गेलो तरी महत्वाची पदं तरी आपल्या पदरात पाडून घेता येतात का याचा प्रयत्न आता शिंदेंनी सुरू केला आहे अशीही चर्चा सध्या सुरू आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री असताना पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायचं का याचा ही ते विचार करत आहेत. देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री राहीले असताना त्यांनी उपमुख्यमंत्री हे पद स्विकारलं होतं. तेच शिंदेंच्या वाट्याला येणार का की ते पुन्हा मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.     
 

Advertisement