जाहिरात

सर्वात मोठा पक्ष मात्र शिंदेंवर भिस्त, भाजपसाठी एकनाथ शिंदे का महत्त्वाचे?

भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 132 जागा जिंकल्याने त्यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. मात्र निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा लढल्या गेल्याने ते मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेना नेत्यांची इच्छा आहे.

सर्वात मोठा पक्ष मात्र शिंदेंवर भिस्त, भाजपसाठी एकनाथ शिंदे का महत्त्वाचे?

महाराष्ट्र निवडणूक निकाल लागून चार दिवस उलटून गेले आहेत. महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीची सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा आहे. मात्र अजूनही महायुतीकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झालेल्या नाहीत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने सरकार स्थापनेला उशीर होत असल्याचा म्हटलं जात आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 132 जागा जिंकल्याने त्यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. मात्र निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा लढल्या गेल्याने ते मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेना नेत्यांची इच्छा आहे. अशारीतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदावरून एकप्रकारे रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाल पाठिंबा दिल्याने त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना डावलून भाजप कोणताही निर्णय घेऊन इच्छित नसल्याचं चित्र आहे. म्हणून भाजपकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढली जात असल्याचंही बोललं जात आहे. मात्र एकनाथ शिंदे भाजपसाठी महत्त्वाचे का आहेत? यावर एक नजर टाकुया.

(नक्की वाचा-  राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मविआच्या मोठ्या नेत्याकडून प्रयत्न सुरू)

भाजपने वापर केल्याच चुकीचा मेसेज जाईल

विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 57 जागा जिंकल्या. त्यानंतर शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा थेट मेसेज लोकांमध्ये गेला आहे. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीमुळे लोकांमध्ये एक चुकीचा मेसेज देखील जाऊ शकते. महायुतीपासून शिंदे वेगळे झाल्यास भाजपने सत्तेसाठी शिंदे यांचा वापर करून घेतला असा प्रचार होऊ शकतो. ज्याचा फटका भाजपला आगामी काळात बसू शकतो.

मराठा समाजाच्या नाराजीचा फटका

याशिवाय एकनाथ शिंदे हे महायुतीतील सर्वात मोठा मराठा चेहरा मानले जातात. एकनाथ शिंदे यांना वेगळा काही निर्णय घेतल्यास मराठा समाजाच्या भावनांना मोठा धक्का बसू शकतो. मराठा समाजाची नाराजी ओढावून घ्यायची नसेल तर एकनाथ शिंदे यांना सोबत ठेवावच लागेल. कारण एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मात करण्यासाठी भाजपला बळ मिळेल.

(नक्की वाचा - ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?)

मुंबई महापालिका निवडणूक 

मुंबई महानगरपालिका (BMC) देशातील सर्वात श्रीमंत नगरपालिकांपैकी एक आहे. मुंबई महापालिका मागील 25 वर्षे  शिवसेनेच्या ताब्यात होती. शिवसेना फुटल्यानंतर बीएमसी ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदे यांचा पाठिंबा भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतो.

नक्की वाचा - अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं

विरोधकांना मुद्दा मिळेल 

शिंदे गटाला बाजूला सारून महायुतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले तर ते विरोधकांना मोठा मुद्दा मिळेल. याचा वापर विरोधी पक्ष महायुतीवर हल्ला करण्यासाठी करु शकतात. शिंदे यांना महाराष्ट्र जिंकण्यासाठी वापर केल्याच आरोप भाजपवर होऊ शकतो. एवढेच नाही तर महायुतीतील फुटीमुळे महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारणही सुरू होऊ शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com