बारामतीत सांगता सभेत सुप्रिया सुळे भावुक, अजित पवारांवर साधला निशाणा

साहेबांनी अनेक वेळा विचारलं होतं की तुला काय पाहिजे. खासदारकी पाहिजे का? तेव्हा नाही म्हणाले. पण आता काय झालं, असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना विचारला.

जाहिरात
Read Time: 2 mins

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्याआधी शरद पवार गटाची सांगता सभा आज पार पडली. या सभेत भाषण करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे यांना अश्रू देखील अनावर झाले. 

सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, बारामतीकरांनो मला मेरिटमध्ये विजयी करा. यावेळी चिन्ह बदललं, जागा गेली, नाव गेलं. मला वाटलं आता काय होणार. पण मला मिळालेलं तुतारी हे चिन्ह युद्ध पुकरण्यासाठी योग्य आहे.  हे युद्ध महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मी फक्त एकच प्रश्न विचारते की असं काय पाहिजे होतं की तुम्हाला मिळालं नाही. खुलके मांगा होता तो दिल खोलके दिया होता, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोला लगावला. मी गेल्या 10 महिन्यात कणखर झाले आहे. ही वैचारिक लढाई आहे. पण घरातली उणीधुणी काढल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही.

नक्की वाचा- बारामतीत अजित पवार-शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; सांगता सभेआधीच्या रॅलीतील प्रकार

साहेबांनी अनेक वेळा विचारलं होतं की तुला काय पाहिजे. खासदारकी पाहिजे का? तेव्हा नाही म्हणाले. पण आता अचानक काय झालं, असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना विचारला. तसेच धमकी द्यायला लाचार लोक शोधू नका. दम असेल तर बरोबरीच्या लोकांना धमकी द्या, असं थेट आव्हान सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना दिलं. 

Advertisement

18 वर्ष तुमच्या विचारांचा प्रचार केला. प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल तसं आम्ही केलं. त्यानंतर तुम्ही आम्हाला असा त्रास देणार का? असं बोलताना सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार वक्तव्याचाही सुप्रिया यांनी समाचार घेतला. समोरचे येतील आणि म्हणतील आमचं शेवटचं इलेक्शन असेल. असे सांगून मत मिळवतील, अशी टीका करणाऱ्यांना सांगू इच्छिते त्यांना अजून खूप निवडणुका लढवायच्या आहेत. ही निवडणूक शेवटची आहे की पहिली हे पांडुरंग पाहून घेईल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

(नक्की वाचा - रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?

तुमच्या पेक्षा जास्त बारामतीत फेऱ्या आम्ही मारतो. तुमच्या पेक्षा जास्त विकास आम्ही केलाय. म्हणूनच हे माझं घर आहे, ते तुम्ही ठरवू नका. मला माझी स्वतंत्र ओळख आहे, असं सांगत सूनेत्रा पवार यांच्यावरही सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. 

Advertisement