Beed : शरद पवार बीडमध्ये भाकरी बदलणार! जरांगे-पाटलांच्या सहकाऱ्याला देणार उमेदवारी?

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तीन आमदारांनी पवारांशी अजित पवार गटात प्रवेश केला

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

Beed Vidhansabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुका जाहीर होताच सर्व मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय. बीड जिल्हा देखील त्याला अपवाद नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठी बीड जिल्हा महत्त्वाचा आहे. 

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तीन आमदारांनी पवारांशी अजित पवार गटात प्रवेश केला. फक्त बीडचे आमदार संदीप क्षीरसागर शरद पवारांसोबत राहिले. आता यंदाच्या निवडणुकीत पवार क्षीरसागरांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. 

बीडमध्ये भाकरी फिरवणार?

बीड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नाराजीचा सूर दिसून येत असल्याने या मतदारसंघात देखील शरद पवार गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे भानुदास जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत मुलाखत दिली आहे.

( नक्की वाचा : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीला धक्का, एक पक्ष पडला बाहेर )

कोण आहेत जाधव?

भानुदास जाधव हे व्यवसायाने कर सल्लागार असून मागील अनेक वर्षांपासून ते मराठा आंदोलनाच्या चळवळीत सक्रिय कार्यरत आहेत.  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. लोकसभा निवडणुकीतील अंदाज पाहता पवार बीड, आष्टी, माजलगाव आणि परळी मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळणार? याकडेच लक्ष आहे. मात्र अशातच विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना पर्याय म्हणून जाधव यांनी तयारी सुरू केलीय. शरद पवार गटाने उमेदवारी न दिल्यास जरांगे पाटील यांच्या विचारातून ही निवडणूक लढविण्याची तयारी जाधव यांनी केली आहे.

Advertisement

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )