बारामती लोकसभेसाठी मतदान होणार होते. त्याच्या आदल्या रात्री पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखाचे काम सुरू होते. याबाबतचा एक व्हिडीओ आमदार रोहीत पवार यांनी शेअर केला होता.त्यानंतर पवार कुटुंबात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. रात्रभर बँक सुरू ठेऊन पैसे वाटपाचे काम सुरू होते असा आरोपही रोहीत पवार यांनी केला होता. आता त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी बँकेचे मॅनेजरवर निलंबनाची कारावाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रोहीत पवारांच्या आरोपांना बळ मिळाले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखेच्या मॅनेजर वर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे. बारामती लोकसभेच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर रात्री बँक सुरू ठेवल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियात शेअर केला होता. पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी बँक मॅनेजर वर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं याची दखल घेतली. शिवाय बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात बँकेच्या आत 40 ते 50 कर्मचारी असल्याचं समोर आले. ही बाब गंभीर असलयाने आयोगाने तात्काळ मॅनेजवरव निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस, 11 मतदार संघात प्रचार थंडावणार
नक्की प्रकरण काय?
बारामती लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे ला मतदान झाले. त्याच्या आदल्या रात्री म्हणजेच 6 मे ला पुणे जिल्हा बँकेची वेल्हे ही शाखा रात्रभर सुरू होती. या बँकेवर अजित पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही बँक रात्रभर का सुरू होती. असा प्रश्न रोहीत पवार यांनी उपस्थित केला होता. शिवाय बँक रात्री सुरू असल्याचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर शेअर केला होता. अजित पवारांनी या आरोपाकडे दुर्लक्ष करत रोहीत पवारांवरच टिका केली होती. तो व्हिडीओ कधीचा आहे. त्या बँकेत रात्री तुम्ही गेला होता का असे उलट प्रश्न अजित पवारांनी केले होते. मात्र रोहीत पवारांच्या आरोपानंतर आयोगाने केलेल्या या कारवाई मुळे रोहीत यांच्या आरोपाला बळ मिळाले. त्यामुळे या कारवाई नंतर आता अजित पवार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.