लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे ला होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. राज्यात पहिल्या तीन टप्प्यातील मतदार पार पडले आहे. चौथ्या टप्प्यात एकूण 11 मतदार संघात मतदान होईल. तर देशातल्या 10 राज्याचील 96 मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे. राज्यात रावसाहेब दानवे पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, हिना गावीत, रक्षा खडसे हे दिग्गज मैदानात आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यातल्या 11 लोकसभा मतदार संघात 13 मे ला मतदान होत आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या मतदार संघाचा समावेश आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असेल. चौथ्या टप्प्यातील अनेक लढती या चुरशीच्या होत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती अशा या लढती आहेत.
हेही वाचा - पुण्यात राज ठाकरेंचा शरद पवारांवर घणाघात, अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक
जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, बीड मधून पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर, हीना गावीत, रक्षा खडसे, हे दिग्गज चौथ्या टप्प्यात मैदानात आहेत. या सर्वांसाठी त्यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी या मतदार संघात सभांचा धडाका लावला होता. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी धुरा सांभाळली होती.
हेही वाचा - 17 नंबरच्या फॉर्मवरुन धुमाकूळ, निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्रस्त, पुण्यात नेमकं घडलं तरी काय?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संभाजीनगरमध्ये तीनही उमेदवार आक्रमक प्रचार करणार आहेत. महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्याकडून शहरातील क्रांती चौकातून रॅली काढली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची देखील रॅली निघणार आहे. तसेच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची पैठण गेट परिसरात सभा होणार आहे. त्यामुळे आज संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world