आंध्रप्रदेशच्या भाजप प्रदेश अध्यक्ष आणि तीन वेळा लोकसभा खासदार डी पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षाचं नाव एनडीए सरकारकडून ठरवण्यात येणार आहे.
डी. पुरंदेश्वरी तेलुगू देशम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची नातेवाईक आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्या आधापासून लोकसभा स्पीकरचं पद टीडीपीने मागितल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान पुरंदेश्वरी यांच्या नावावर दोन्ही पक्षांकडून पाठिंबा दिल्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर
कोण आहेत डी. पुरंदेश्वरी?
पुरंदेश्वरी या सध्या आंध्रप्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहे. त्या टीडीपीचे संस्थापक एन.टी.रामाराव यांच्या कन्या आहे. पुरंदेश्वरी यांची बहिण चंद्राबाबू नायडू यांची पत्नी आहे. राजामुंद्री लोकसभा मतदारसंघातून सध्या खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्या दोन वेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहे. मात्र
2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसकडून 2009 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या. 2012 मध्येही त्या वाणिज्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या. पुरंदेश्वरी या चंद्राबाबू नायडूंच्या विरोधक म्हणून ओळखल्या जात होत्या, पण आता युती घडवून आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.