जाहिरात
Story ProgressBack

कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

Read Time: 3 mins
कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर
नवी दिल्ली:

नरेंद्र मोदींनी 9 जून, रविवारी सायंकाळी 7.30 वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा आयोजित केला होता. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी  पंतप्रधानांसह 72 जणांनी शपथ घेतली. यामध्ये 31 कॅबिनेटमंत्री आणि 41 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. यामध्ये एकूण सात महिला मंत्र्यांचाही समावेश आहे. 

जाणून घेऊया एनडीएच्या मंत्रिमंडळातील काही वैशिष्ट्ये...

- 72 पैकी 61 मंत्री भाजप आणि 11 मित्र पक्षातील आहे. 
- 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी, 4 अल्पसंख्याक, मुस्लीम मंत्री नाही
- 24 राज्यांचं प्रतिनिधित्व - उत्तरेकडील 18 मंत्री, 17 पश्चिमेकडील, 15 पूर्वेकडील, 13 दक्षिणेकडील, 6 मध्य आणि 6 उत्तर पूर्वेकडील मंत्र्यांचा समावेश.
- यंदाच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांचा समावेश
- एससी, एसटी आणि ओबीसी मंत्र्यांची संख्या वाढली
- लोअर-अप्पर कास्ट समीकरण साधण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय
- मंत्रीमंडळात 7 महिला मंत्र्यांचाही समावेश, महाराष्ट्रातून रक्षा खडसेंना संधी
- मंत्रीमंडळात एकाही मुस्लिम मंत्र्याचा समावेश नाही
- 30 जणांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, आतापर्यंतचं सर्वात मोठं मंत्रीमंडळ
- भाजपच्या मित्रपक्षांना 11 मंत्रीपदं, अजित पवार गटाला तुर्तास तरी एकही नाही
- टीडीपीचे के राममोहन नायडू हे सर्वात तरुण मंत्री, वय 36 वर्ष
- सर्वात जास्त मंत्री उत्तर प्रदेशचे 11, त्यानंतर बिहारचे 8 आणि महाराष्ट्र, गुजरातचे प्रत्येकी 6
- एल मुरुगन हे एकमेव मंत्री, जे लोकसभेला पराभूत होऊनही मंत्री झालेत
- ठाकूर समाजाचे सर्वाधिक चार मंत्री, राजनाथसिंह, गजेंद्रसिंह शेखावत, जितेंद्रसिंह, किर्तीवर्धन
- कोणत्या राज्यातून किती मंत्री
उत्तर प्रदेश - 10
बिहार - 8
महाराष्ट्र -6
गुजरात - 5
कर्नाटक - 5
मध्यप्रदेश - 5
राजस्थान -4
आंध्रप्रदेश - 3
ओडिशा - 3
हरियाणा - 3
झारखंड - 2
पश्चिम बंगाल - 2
तेलंगणा - 2
केरळ - 2
पंजाब -1, गोवा -1, दिल्ली -1, तामिळनाडू -1, छत्तीसगड - 1, जम्मू-काश्मीक -1, अरूणाचल प्रदेश -1, आसाम - 1, हिमाचल - 1, उत्तराखंड - 1

- 39 जणांना यापूर्वी केंद्रात मंत्रिपद राहिलेले आहे.
- कोणत्या दिग्गजांचा पत्ता कट?
स्मृती इराणी
नारायण राणे
अर्जुन मुंडा
अनुराग ठाकूर
डॉ. भागवत कराड
जनरल व्हि के सिंग
- 33 नव्या चेहऱ्यांना संधी
- सात महिला मंत्र्यांचा समावेश
रक्षा खडसे
शोभा करंदलाजे
अन्नपूर्णा देवी
अनुप्रिया पटेल
निर्मला सीतारामन
सावित्री ठाकूर
नीमूबेन भामडीया

कोण कोणत्या मंत्र्यांनी घेतली शपथ...
कॅबिनेट मंत्री

1 नरेंद्र मोदी - 
2 राजनाथ सिंह  
3 अमित शाह
4 नितीन गडकरी  
5 जगतप्रकाश नड्डा 
6 शिवराजसिंह चौहान 
7 निर्मला सीतारमण 
8 एस. जयशंकर
9 मनोहरलाल खट्टर
10 एच डी कुमारस्वामी 
11 पीयूष गोयल 
12 धर्मेंद्र प्रधान
13 जीतन राम मांझी
14 राजीव रंजन सिंह 
15 सर्वानंद सोनोवाल 
16 विरेंद्र कुमार
17 किंजरप्पू राममोहन नायडू 
18 प्रल्हाद व्यंकटेश जोशी 
19 जुवेल उराम 
20 गिरीराज सिंह
21 अश्विनी वैष्णव
22 ज्योतिरादित्य शिंदे 
23 भूपेंद्र यादव
24 गजेंद्रसिंह शेखावत 
25 अन्नपूर्णा देवी 
26 किरण रिजीजू 
27 हरदीपसिंह पुरी
28 मनसुख मांडविया 
29 जी किशन रेड्डी
30 चिराग पासवान
31 सी आर पाटील 

राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार
1  इंद्रजित सिंह
2 डॉ. जितेंद्र सिंह
3 अर्जुनराम मेघवाल
4 प्रतापराव गणपतराव जाधव  महाराष्ट्र
5 जयंत चौधरी

राज्यमंत्री 
6 जितेंद्र प्रसाद
7 श्रीपाद नाईक 
8 पंकज चौधरी
9 श्रीकृष्ण पाल 
10 रामदास आठवले 
11 रामनाथ ठाकूर 
12 नित्यानंद राय
13 अनुप्रिया पटेल
14 व्ही सोमन्ना
15 चंद्रशेखर पेम्मासानी
16 एस पी सिंह बघेल 
17 शोभा करंदलाजे
18 कीर्तीवर्धन सिंह 
19 बी एल वर्मा
20 शंतनू ठाकूर
21 सुरेश गोपी
22 डॉ. एल मुरूगन
23 डॉ. अजय तमटा
24 संजय कुमार
25 कमलेश पासवान
26 भागीरथ चौधरी
27 सतीशचंद्र दुबे
28 संजय शेठ
29 रवनीत सिंह बिट्टू
30 दुर्गादास वि के
31 रक्षा खडसे 
32 सुकांता मुजूमदार
33 सावित्री ठाकूर
34 तोखन साहू
35 राजभूषण चौधरी
36 श्रीनिवास वर्मा
37 हर्ष मल्होत्रा
38 नीमूबेन भामडीया
39 मुरलीधर मोहोळ
40 जॉर्ज कुरीयन
41 पवित्र मार्गारिटी

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Modi 3.O : मोदींच्या मंत्रिमंडळात 31 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी, महाराष्ट्रातील किती जणांचा समावेश, राज्यमंत्री किती?
कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर
raksha khadse took oath as minister of state in modi government when will eknath khadse join bjp
Next Article
रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी, पण एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी? 
;