उत्तर प्रदेशात लोकसभा मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप उमेदवाराचं निधन

उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद लोकसभा मतदासंघातील भाजपचे उमेदवार सर्वेश सिंह यांच्या मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निधन झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
उत्त:

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी एक दु:खद बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद लोकसभा मतदासंघातील भाजपचे उमेदवार सर्वेश सिंह यांचं मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

सर्वेश सिंह हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिले होते. 72 वर्षीय सर्वेश यांची तब्येत मागील काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.

उत्तर प्रदेश भाजपचे प्रमुख भूपेंद्र चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटलं की, सर्वेश यांना घशाचा त्रास होत होता. त्यांचं ऑपरेशन देखील झालं होतं. शनिवारी देखील ते एम्स रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वेश सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. 'सर्वेश यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा आणि समाजसेवा करत होते. त्यांच्या जाण्याने भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वार शक्ती देवो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं.

Advertisement

योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, 'आमचे उमेदवार आणि मुरादाबादचे माजी खासदार कुंवर सर्वेश कुमार सिंह जी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. भाजप परिवाराचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. प्रभू श्री राम त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती'