सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेसमधून इच्छूक असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये देखील सगळं आलबेल आहे, असं नाही.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा
कारण सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि मिरजेमधील भाजपचे बंडखोर नगरसेवकामध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन वेळा संधी स्थायी समितीवर संधी दिली. पक्षाच्या जीवावर मोठे झाले, मात्र आता अशा अपप्रवृत्तींना ठेचायची वेळ आली आहे. उद्याच्या राजकारणात त्यांना घरी बसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ खासदार संजयकाका पाटील यांनी मिरज येथील प्रचारादरम्यान घेत बंडखोर नगरसेवकांना इशारा दिला आहे.
(नक्की वाचा- तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार?)
संजयकाका पाटील यांच्या इशाऱ्यानंतर बंडखोर नगरसेवक देखील आक्रमक झाले आहे. बंडखोर नगरसेवक गटाचे नेते सुरेश आवटी यांनी संजयकाका पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. जनता ज्या बाजूने असते त्या बाजूने उभं राहणं आमचं कर्तव्य आहे. आम्हाला निवडणूक आणायंच की पाडायचं हे जनता ठरवेल.
(नक्की वाचा - 'उबाठा' ला बाळासाहेब ठाकरेंची लाज वाटते, शिवसेनेचा थेट आरोप)
एखादा नेते म्हणेल की आम्हाला पाडणार तर हे बापजन्मी शक्य होणार नाही. दम असेल तर एका व्यासपीठावर या, असे आव्हान सुरेश आवटी यांनी संजयकाका पाटील यांना दिले. विशेष म्हणजे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या मिरजेतल्या प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.