पुण्यात भाजपाला मोठा धक्का, 'या' नेत्यानं हाती घेतली तुतारी

गणेश विसर्जनाची राज्यात धामधुम सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीला पुण्यात धक्का बसला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी 

गणेश विसर्जनाची राज्यात धामधुम सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीला पुण्यात धक्का बसला आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. पठारे यांनी त्यांचे चिरंजीव चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक महादेव पठारे, महेंद्र पठारे आणि भैय्यासाहेब जाधव यांच्यासह मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. खासदार सुप्रिया सुळे देखील यावेळी उपस्थित होत्या.

बापूसाहेब पठारे यांनी गणेसोत्सवाच्या काळात एका गणेश मंडळाला भेट देऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी 'तुतारीला मतदान करा' असं आवाहन केलं होतं. त्यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचवेळी पठारे भाजपा सोडणार हे स्पष्ट झालं होतं. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहेत पठारे?

बापूसाहेब पठारे हे पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 साली भाजपाच्या जगदिश मुळीक यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर पठारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

( नक्की वाचा : 'भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर....' गिरीश महाजनांनी सांगितलं एकच नाव )

भाजपामध्ये प्रवेशानंतरही त्यांना 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती. भाजपानं पुन्हा एकदा जगदीश मुळीक यांनी उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी त्यांचा पराभव केला.

पुण्यातील विमाननगरमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोर्शे कार अपघातामध्ये टिंगरे यांचं नाव चांगलंच गाजलं होतं. या अपघाताला जबाबदार असलेल्या मुख्य आरोपीला तसंच त्याच्य़ा कुटुंबीयांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा टिंगरे यांच्यावर आरोप झाला होता. टिंगरे सध्या अजित पवार गटात आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये अनेक उमेदवार सध्या इच्छूक आहेत. ही जागा भाजपा आणि अजित पवार गट यामध्ये कुणाला सुटणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानंच बापूसाहेब पठारे यांनी भाजपासोडून जुन्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असं मानलं जातंय.  

Topics mentioned in this article