जाहिरात

BMC Election 2026: BJPकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरातील तिघांना उमेदवारी, कोणाला मिळालं तिकीट?

BMC Election 2026 BJP Candidate List: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन जणांना उमेदवारी जाहीर, कुठून लढणार निवडणूक?

BMC Election 2026: BJPकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरातील तिघांना उमेदवारी, कोणाला मिळालं तिकीट?
"BMC Election 2026 BJP Candidate List: विधानसभा अध्यक्षांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना उमेदवारी जाहीर"
PTI

BMC Election 2026 BJP Candidate List: भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी (30 डिसेंबर) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलीय. राहुल नार्वेकर यांनी या उमेदवारांच्या आपापल्या वॉर्डमधील कामगिरीचा हवाला देत पक्षाच्या निर्णयाचे समर्थन केलंय.

राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील कोणाकोणाला उमेदवारी जाहीर?

भाजपने बीएमसी निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर-नार्वेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय

कोणत्या वॉर्डमधून लढणार निवडणूक? 

वॉर्ड क्रमांक 225 : हर्षिता नार्वेकर 
वॉर्ड क्रमांक 226 : मकरंद नार्वेकर 
वॉर्ड क्रमांक 227 : गौरवी शिवलकर-नार्वेकर

(नक्की वाचा: BJP Candidate List: मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 102 उमेदवारांना एबी फॉर्म; संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर)

राहुल नार्वेकर यांनी काय दिली प्रतिक्रिया

राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, "मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांनी आपापल्या वॉर्डमध्ये चांगलं काम केलंय, ज्यामुळे त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे कोणीही नाही. विरोधकांना या जागा जिंकण्याची कोणती संधी आहे, असे मला वाटत नाही. पक्ष निश्चितच या जागा राखेल".

(नक्की वाचा: आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का? ठाकरेंवर कार्यकर्ते भडकले; मातोश्रीबाहेर भयंकर मोठा ड्रामा)

महाराष्ट्र | महानगरपालिका निवडणूक 2026 FAQs | BMC Election 2026 FAQs 

1. महाराष्ट्रात किती महानगरपालिकांची निवडणूक आहे?

मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया होईल. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. 

2. मतदान केंद्रावर जाताना सोबत कोणती ओळखपत्रे न्यावी?

आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्ड (PAN Card), पासपोर्ट (Passport), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), बँक/पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक (Passbook), मनरेगा जॉब कार्ड (MGNREGA Job Card)

3. आधार कार्ड दाखवल्यास मतदान करता येते का?

मतदार यादीत तुमचे नाव असल्यास ओळखपत्रासाठी तुम्ही आधार कार्ड दाखवून मतदान करू शकता.

4. मतदारासाठीची पात्रता काय असते?

तुम्ही भारताचे नागरिक असावे आणि अर्हता दिनांकाला (Qualifying Date) तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. तुमचे नाव ज्या प्रभागाच्या (Ward) मतदार यादीत आहे, तिथेच तुम्हाला मतदान करता येते.

5. महानगरपालिकेचा कालावधी (Tenure) किती असतो?

महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेसाठी निश्चित केलेल्या दिनांकापासून पाच वर्षांचा असतो.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com