BMC Election 2026 : खासदार संजय दिना पाटलांचा 'गेम' होतोय? भांडुपच्या रणांगणात पडद्यामागे मोठ्या हलचाली

BMC Election 2026:  भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 114 च्या निवडणुकीत आता राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असून उबाठा खासदार संजय दिना पाटील यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
BMC Election 2026:  भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 114 ची निवडणूक आता रंगतदार होणार आहे.
मुंबई:

BMC Election 2026: मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.  भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 114 च्या निवडणुकीत आता राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असून उबाठा खासदार संजय दिना पाटील यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांची मुलगी राजुल पाटील या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनि र्माण सेना युतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

मात्र त्यांच्या विरोधात मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर यांनी आपले आव्हान कायम ठेवल्याने या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आपला राजकीय गेम केला जात असल्याची भीती आता खासदार पाटील यांना सतावू लागली आहे.

राज ठाकरेंची भेट आणि उमेदवारीचा पेच

मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर यांनी शुक्रवारी 2 जानेवारी 2026 रोजी रात्री उशिरा मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे न घेता ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये हा वॉर्ड शिवसेना UBT कडे गेला असून राजुल पाटील या अधिकृत उमेदवार आहेत. अशा स्थितीत मनसेच्या बंडखोर उमेदवाराने निवडणूक लढवण्याचा घेतलेला पवित्रा हा राजुल पाटील यांच्यासाठी अडचणीचा ठरणार असल्याचे दिसत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : PCMC Election: 'फडणवीसांना आधीच सावध केलं होतं!' अजित पवारांबाबत भाजपा प्रदेशाध्यक्षाचं मोठं वक्तव्य )
 

संजय दिना पाटील यांची अस्वस्थता आणि संशय

आपल्या मुलीचा पराभव करण्यासाठी जाणीवपूर्वक हा डाव खेळला जात असल्याचा संशय खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केला आहे. गेल्या 4 दिवसांपासून ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आणि या वादावर तोडगा काढून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र राज ठाकरे त्यांना वेळ देत नसल्याने पाटील कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. यामुळेच आपल्या मुलीचा राजकीय बळी दिला जात असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असून यातूनच मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून हायव्होल्टेज ड्रामा

काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भांडुपमध्ये मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अस्वस्थ झालेले संजय दिना पाटील आपल्या मुलीसह निवडणूक अधिकारी कार्यालयात पोहोचले होते. आपली मुलगी राजुल पाटील हिचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला होता. 

Advertisement

मात्र यावेळी शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, मिलिंद नार्वेकर आणि रमेश कोरगावकर यांनी तातडीने मध्यस्थी केली. या नेत्यांनी संजय दिना पाटील यांची समजूत काढली आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यापासून रोखले.

( नक्की वाचा : महापालिकेत महायुतीला बुस्टर डोस; भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी, वाचा सर्व नावं एका क्लिकवर )

मनसे कार्यकर्त्यांना गुप्त सूचना मिळाल्याची चर्चा

एकीकडे राजुल पाटील या युतीच्या अधिकृत उमेदवार असल्या तरी दुसरीकडे पडद्यामागे वेगळ्याच हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेतील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर यांनाच मदत करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. 

Advertisement

मनसेची ही ताकद माजगावकर यांच्या मागे उभी राहिली, तर राजुल पाटील यांच्या विजयाचा मार्ग खडतर होऊ शकतो. यामुळेच भांडुपच्या राजकारणात आता ठाकरे बंधूंच्या युतीमधील कुरबुरी चव्हाट्यावर आल्या असून संजय दिना पाटील यांची मोठी कोंडी झाली आहे.
 

Topics mentioned in this article