सकाळी काँग्रेसचा प्रचार अन् सायंकाळी शिंदे गटात प्रवेश, गीता यादव यांची जोरदार चर्चा

गीता यादव यांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांसह शुक्रवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

चारकोप विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून निवडणूक लढवणारे जयप्रकाश सिंह यांच्यासाठी प्रचार केल्याच्या काही तासांनंतर माजी नगरसेवक गीता यादव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. गीता यादव या कांदिवली पश्चिम वॉर्ड क्रमांक २८ मधून तीन वेळा नगरसेवक राहिल्या आहेत. गीता यादव यांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांसह शुक्रवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मागाठाणा विधानसभेचा आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते.  

नक्की वाचा - 'माझ्या जागेवर दुसरीला आणलं', रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत ओक्साबोक्शी रडल्या...

काही तासांत गीता यादव यांनी महायुतीचे उमदेवार भाजपचे योगेश सागर यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.  शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत गीता यादव यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व पाहून मी प्रभावित झाले आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी योजना आणल्या, विशेषत: महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना. ते पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सन्मानाने वागवतात. एकनाथ शिंदे आणि प्रकाश सुर्वे दोघेही कार्यकर्त्यांचं महत्त्व जाणतात. काँग्रेसमधील विरोधाभास, गटबाजीमध्ये कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केलं जातं. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माजी नगरसेवकाने अचानक महायुतीचा प्रचार सुरू केल्याने बोरीवलीत मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र गीता यादव या बदलावर ठाम आहे. जनतेला सर्वकाही माहिती आहे, माझ्या समर्थकांना हे कळतंय आणि सर्वजणं माझ्या पाठिशी आहे.