प्रतीक्षा पारखी, पुणे
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासह 30 ते 40 सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपने पैसे वाटल्याच्या आरोपाखाली पोलीस ठाण्यात धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. सहकार नगर पोलीस ठाण्यात जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदानाच्या एक दिवस अगोदर रविवारी (12 मे) रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं होते. महायुतीचे कार्यकर्ते लोकांना पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता. झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं होतं. मात्र तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याने धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह सहकार नगर पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं होतं.
(नक्की वाचा- राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी भाजपानं 'या' नेत्याचं नाव केलं निश्चित)
या आंदोलनामुळे धंगेकर अडचणीत सापडले आहेत. या आंदोलनामुळे त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 143, 145, 149, 188 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135, लोकप्रतिनीधी अधिनियम 1951 चे कलम 126 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- आमदाराने मतदाराच्या लगावली कानशिलात, मिळालं जशास तसं उत्तर; Video Viral)
जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा धंगेकरांनी घेतला होता. याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world