'भाजप मोठाच भाऊ, पण...' भुजबळ पुन्हा बोललेच, दादा- फडणवीस काय करणार?

सतर्क राहा आणि काळजी घ्या असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला होता. मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद महायुतीत पहायला मिळाले.

Advertisement
Read Time: 3 mins
नाशिक:

लोकसभा निवडणुकीत जे झालं ते विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका. सतर्क राहा आणि काळजी घ्या असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला होता. मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद महायुतीत पहायला मिळाले. भाजपहा महायुतीत मोठा भाऊ आहे. त्यामुळे भाजपलाच जास्त जागा मिळतील असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावर भुजबळांनी पुन्हा वक्तव्य केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकाला आधीच महायुतीत वाकयु्द्ध सुरू झाले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजप बरोबर जाण्या आगोदर आम्हाला किती जागा मिळणार? किती मंत्रीपदं मिळणार हे आम्हाला सांगितले गेले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या विधानसभेला होवू नयेत असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. लोकसभेला झाले ते गेले पण विधानसभेला सतर्क राहा. किमान 80 ते 90 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पाहीजेत असेही ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर देंवेद्र फडणवीस यांनी भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे भाजपलाच सर्वात जास्त जागा मिळतील. त्याच बरोबर मित्र पक्षांबरोबरही चर्चा करून योग्य सन्मान राखला जाईल असे फडणवीस म्हणाले. 

Advertisement

हेही वाचा - शांत रहा, गप्प बसा! कीर्तिकरांना माध्यमांशी बोलण्यास बंदी

त्यावर बोलताना भुजबळ यांनी भाजपहा मोठाच भाऊ आहे. त्यांना कमी जागा द्या असं बोलायला मी काही मुर्ख नाही असे भुजबळ म्हणाले. मात्र पक्षाच्या व्यासपिठावर आपण नेत्यांना काही गोष्टींची आठवण करून दिली होती. ते काही चुकीचे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन तीन महिन्यात विधानसभेचे पडघम वाजतील. त्यामुळे जागा वाटपात सतर्क राहा असेही ते म्हणाले. शिवाय आहेत तेवढ्याच जागा मिळाल्या तर त्यापेक्षा कमी जागा निवडून येतील. जर कुठे 80 ते 90 जागा मिळाल्या तर आहेत तेवढ्या जागा तरी राखता येतील असेही ते पुन्हा एकदा म्हणाले. भाजप हा मोठा पक्ष आहे त्यांनी आमचा सन्मान राखलाच पाहीजे. तेच आम्हाला हवे आहे असेही ते म्हणाले.     

Advertisement

हेही वाचा - पोस्टात खातं उघडलं की 8 हजार रुपये मिळणार? पहाटे 3 पासूनच लागल्या रांगा, वाचा काय आहे सत्य

Advertisement

दरम्यान भुजबळांवर भाजप नेते निलेश राणे यांनीही पलटवार केला आहे. छगन भुजबळांना आवरा असे त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटले आहे. 400 पारच्या नाऱ्याचा त्रास झाला. मोदी संविधान बदलणार नाहीत हे सांगताना दमछाक झाली असे वक्तव्यही भुजबळांनी केले होते. त्याचा समाचार राणे यांनी घेतला. नेहमी आम्ही भुजबळांचे का ऐकून घ्याचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय भुजबळांच्या वयाचा आम्ही आदर करतो, पण युती बिघडवण्याची भाषा कोणी करत असेल तर ते सहन होत नाही असेही ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.