'सगळंच उकरायला गेले तर, बात बहुत लंबे तक जायेगी' पवार- भुजबळांत जुंपली

भुजबळांच्या घोटाळ्यांवरही पवारांनी बोट ठेवत त्यांचा पराभव करण्याचे आवाहन केले. पवारांच्या सभेनंतर छगन भुजबळांनीही पवारांचे सर्व आरोप खोडत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

शरद पवारांनी येवल्यात येवून छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. मी त्यांना सर्व काही दिलं पण त्यांनी मला धोका दिला असा आरोप शरद पवारांनी केला. शिवाय भुजबळांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहोत असंही ते म्हणाले. त्याच बरोबर भुजबळांच्या घोटाळ्यांवरही पवारांनी बोट ठेवत त्यांचा पराभव करण्याचे आवाहन केले. पवारांच्या सभेनंतर छगन भुजबळांनीही पवारांचे सर्व आरोप खोडत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सगळंच उकरायला गेले तर, बात बहुत लंबे तक जायेगी असं म्हणत त्यांनी एक प्रकार शरद पवारांना इशाराच दिला आहे.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांच्या येवल्यातल्या सभेनंतर छगन भुजबळांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेत आतल्या गोष्टची सर्वां समोर उघड केल्या. बाळासाहेबांनी मला महापौर केलं हे सत्य आहे. ती त्यासाठी त्यांचा आभारीही आहे. पण शिवसेना फोडण्याचं काम हे शरद पवारांनी केले. 36 नगरसेवकांनी फुटीवेळी सह्या केल्या होत्या. त्यात सर्वात शेवटची सही ही माझी होती याची आठवण भुजबळांनी करून दिली. ज्या वेळी काँग्रेसमधून शरद पवारांना बाजूला केले जात होतं त्यावेळी त्यांच्या मागे खंबिर पणे उभा राहणारा हा छगन भुजबळ होता असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'भुजबळांना सर्व काही दिलं, त्यांनी मात्र धोका दिला' येवल्यात येवून पवारांनी पुढचा प्लॅन सांगितला

सर्व पद दिली कारण आपण मेहनत करत होतो. त्याचा फायदा पक्षाला ही झाला होता. तेलगी घोटाळ्यात आपल्याला जाणिवपूर्वक गोवलं गेलं होतं. आपली बदनामी केली गेली होती. कोणताही दोष नसताना आपल्याला तातडीने राजीनामा द्यायला लावला होता असंही भुजबळ म्हणाले. तेलगी घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागावा यासाठी आपणच प्रयत्न केले. त्यात आपल्याला क्लिनचिट मिळाली असेही ते म्हणाले. पण शरद पवारांनी जुन्या कडीला आता उत का आणला  हे समजले नाही असे भुजबळ यावेळी म्हणाले. निवडणुकीत बदनाम करण्यासाठी पवार बोलले असतील असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - '...तर बाळा साहेबांनी उद्धव ठाकरेंचा हात मोडला असता' राणेंनंतर कदम हे काय बोलले?

जर सगळंच उकरायला गेले तर, बात बहुत लंबे तक जायेगी असा इशाराही भुजबळांनी शरद पवारांना दिला. नवीन लोकांना कॅबिनेट मंत्री करायचं होतं. जास्त लोकांना संधी द्यायची होती म्हणून भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही असे पवार म्हणाले होते याची आठवण भुजबळांनी करून दिली. आपण कोणालाही मुख्यमंत्री केले तर ते आपल्याला जड होतील असे त्यांना वाटले होते. म्हणून शरद पवारांनी मला, अजित पवार आणि आर. आर. पाटील यांना मुख्यमंत्री केले नाही असा आरोप भुजबळांनी यावेळी केला. शिवाय अजित पवारांना का मुख्यमंत्री केले नाही ? असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. 

Advertisement