जाहिरात

'भुजबळांना सर्व काही दिलं, त्यांनी मात्र धोका दिला' येवल्यात येवून पवारांनी पुढचा प्लॅन सांगितला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी येवल्यात सभा घेतली होती.

'भुजबळांना सर्व काही दिलं, त्यांनी मात्र धोका दिला' येवल्यात येवून पवारांनी पुढचा प्लॅन सांगितला
नाशिक:

शरद पवारांनी छगन भुजबळांच्या गडात जावून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळांना सर्व काही दिलं, पण त्यांनी मला धोका दिला अशा शब्दात पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा व्यक्तीचा येवल्यातल्या जनतेने पराभव करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी येवल्यात सभा घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. येवला मतदार संघ हा छगन भुजबळांचा गड समजला जातो. या गडातच जावून पवारांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छगन भुजबळांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच महापौर केले होते. ते महत्वाचे पद होते. त्यानंतर काही गोष्टीवरून भुजबळांनी बाळासाहेबांची टिंगल करायला सुरूवात केली. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या होत्या. अशा वेळी आपल्यावर हल्ला होवू शकतो म्हणून भुजबळ आपल्याकडे आले होते. त्यांना त्यावेळी मी संरक्षण दिले होते असे शरद पवार म्हणाले. पुढे त्यांनी पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यात ते पराभूत झाले. पराभूत झाले असतानाही भूजबळांना विधान परिषदेवर घेतले. तेवढेच नाही तर त्यांना विरोध पक्षनेतेह पदही आपणच दिले असे पवार या सभेत म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - '...तर बाळा साहेबांनी उद्धव ठाकरेंचा हात मोडला असता' राणेंनंतर कदम हे काय बोलले?

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनाच पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष केले. पुढे येवल्यातून उमेदवारी देण्याची चुक आपणच केली असं ही पवार म्हणाले. सत्ता आल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्रीपदही भुजबळांना आपणच दिले होते. पण त्या काळात त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांना पदाचा राजीमाना द्यावा लागला. त्यानंतर मात्र अशा गोष्टी आपल्याकडून होणार नाही असे वचन भुजबळांनी मला दिलं होतं. त्यामुळे सर्व गोष्टी विसरून भुजबळांना पुन्हा संधी देण्यात आली. त्या पुढच्या काळात त्यांच्यावर आरोप झाले. त्यांना जेलमध्ये जावे लागले. त्यावेळी आपण त्यांच्या मागे खंबिरपणे उभे राहीलो होतो असे पवार म्हणाले. मविआचं सरकार आलं त्यावेळीही भुजबळांनाच संधी दिली असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'गावात येऊन रोज तुमचे मुके घ्यायचे काय?' भाजप उमेदवार असं का बोलले?

पुढे पक्षात फुट पडली. त्यावेळी भुजबळ माझ्या घरी आले होते. आपण सर्वांची समजूत काढली पाहीजे. त्यात मी मध्यस्थी करतो असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर ते परत काही आलेच नाहीत.उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या माणसाला सर्व काही दिलं. पण या माणसाने आपल्याला फसवलं. त्याने धोका दिला. भुजबळांनी कोणत्याच मर्यादा ओलांडायच्या शिल्लक ठेवल्या नाहीत. त्यांना विचारांशी काही देणे घेणे नाही.ज्याने त्यांना उभे केले त्याबद्दल त्यांना काही वाटत नाही. अशी धोका देणारी व्यक्त तुमच्याकडे मत मागण्यासाठी येणार आहे. अशा व्यक्तीला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निकाल आता येवल्यातल्या जनतेला घ्यायचा आहे असे पवार यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस, अडीच वर्षात...' शहाजीबापूंनी नक्कल करत सुनावलं

येवल्याचं नाव देशात आहे. पण एका व्यक्ती मुळे हे नाव खराब होणार असेल तर अशा व्यक्तीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे असं ही पवार यावेळी म्हणाले. ही सभा ऐतिहासिक आहे. इथल्या लोकांनी आता माणिकराव शिंदे यांना आमदार करण्याचे ठरवले आहे असं ही ते म्हणाले. येवल्याच्या जनतेवर पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन होणार हे निश्चित आहे असंही ते म्हणाले. ज्यांनी धोका दिला, नेतृत्वाला फसवलं. अशा व्यक्तीला निवडून द्यायचं का याचा विचार नक्की करा असे ही ते म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com