भुजबळांची माघार, आता शिंदे गटातच सस्सीखेच, नाशिकमध्ये काय होणार?

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे. आता ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांनी उचल खालली आहे. अशा स्थितीत उमेदवारी वरून दोन गट पडले आहेत. शिवाय ठाकरेंचाही एक मोहरा शिंदेंच्या संपर्कात आहे. उमदेवारी मिळाल्यास तेही शिंदेंकडे जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता नाशिकच्या उमेदवारी वरून तिढा निर्माण झाला आहे. 

हेही वाचा -  विखे शरद पवारांवर चिडले, थेट भिडले, चांगलेच सुनावले, नेमकं काय घडलं?

शिवसेनेत इच्छुकांची संख्या वाढली 


भुजबळांच्या माघारीनंतर नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहणार हे निश्चित झाले आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी वारंवार ठाणेवारी करून आपणच दावेदार असल्याचे वारंवार सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनीही नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटणार असे आश्वासन दिल्याने हेमंत गोडसेंनीही प्रचार सुरू ठेवला आहे. भुजबळांच्या माघारीनंतर गोडसेंच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  गोडसे सध्या ग्रामीण भागात जोरदार प्रचार करत आहेत. असे असले तरी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हे देखील उमेदवारी इच्छुक आहेत. त्यांनीही शिंदेंकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा पेच शिंदें समोर आहे.  

हेही वाचा - शरद पवारांनी विखे पाटलांची उडवली खिल्ली, एक प्रश्न अन् सर्वच हसले

ठाकरेंचा मावळाही शिंदेंच्या संपर्कात? 


एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेत दोघांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. त्याच वेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळालेले विजय करंजकर हे नाराज आहेत. त्यामुळे ते  ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारातून दुर आहेत. अशा स्थिती करंजकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. भगूर नगरपालिकेवर करंजकर यांचे वर्चस्व आहे. तर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डसह इतर काही नगरसेवकांना घेवून शिंदे गटात प्रवेश करण्याची त्यांची तयारी आहे. त्याचे ही शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पडद्यामागून प्रयत्न सुरू आहेत. 

हेही वाचा - महायुतीमधील धुसफूस वाढली, राष्ट्रवादीचाच एक गट अजित पवारांवर नाराज!

 
रविवारी निर्णय होण्याची शक्यता? 

महाविकास आघाडीने नाशिक लोकसभेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. आघाडीत ही जागा ठाकरे गटाला गेली आहे. त्यांनी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे. अशा वेळी महायुतीतच्या गोटात सामसूम आहे. शिवाय एका पेक्षा जास्त इच्छुक असल्याने एकनाथ शिंदे समोर पेच निर्माण झाला आहे. आधी जागा सुटावी यासाठी चर्चांवर चर्चा सुरू होती. आता जागा सुटण्याची स्थिती असताना उमेदवारी कुणाला द्यायची यावरून तिढा आहे. अशा स्थितीत रविवार संध्याकाळपर्यंत उमेदवारीवर तोडगा काढला जाईल असे सांगितले जात आहे.

Advertisement