जाहिरात

EC on EVM : ईव्हीएम घोटाळा ते संथ मतदान.. निवडणूक आयुक्तांनी दिलं सर्व आक्षेपांना उत्तर

EC on EVM : ईव्हीएम घोटाळा ते संथ मतदान.. निवडणूक आयुक्तांनी दिलं सर्व आक्षेपांना उत्तर
Delhi Assembly Election Date : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.


मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर, 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवरील आरोपांना उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले निवडणूक आयुक्त?

निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की आपण लवकरच 100 कोटी मतदारांचा देश होणार आहोत. मतदारांची एकूण संख्या 99 कोटी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत नवा रेकॉर्ड बनलाय. मतदार यादीमधून नाव वगळणे आणि नवीन नावांची जोडणी करण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीनं आणि काटेकोर राबली जात आहे. त्यामध्ये कोणत्याही अफरातफरीची शक्यता नाही. भारतीय मतदार अत्यंत जागरुक आहेत. मतदार यादींबाबत आता गोष्टी रचल्या जात आहेत.'

निवडणूक आयुक्तांनी यावेळी शायरीमधूनही या प्रश्नाला उत्तर दिलं. ते म्हणाले,  'सब सवाल अहमियत रखते हैं जवाब तो बनता है, आदतन कलमबंद जवाब देते रहे, आज तो रूबरू भी बनता है. क्या पता हम कल हों न हों, आज जवाब तो बनता है.'

राजीव कुमार यांनी एलन मस्क यांचं नाव व घेता त्यांच्याकडून EVM हॅक होत असल्याच्या आरोपांना उत्तर दिलं. ' मस्क यांनी अमेरिकेतील मतमोजणीच्या वेळी देखील प्रश्न उपस्थित केला होता. आपल्याकडील लोकं त्यांचं वक्तव्य दाखवून EVM हॅक होत असल्याचा दावा करत आहेत.'

( नक्की वाचा : AAP vs Congress : आम आदमी पक्षाचा का आहे काँग्रेसवर राग? दिल्लीतील संघर्षाची Inside Story )
 

सर्व प्रश्नांचे उत्तर देणार

मुख्य निवडणूक आयुक्त यावेळी म्हणाले, 'संथ मतदानावर आरोप करण्यात आले. त्याचबरोबर अन्य काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहे. आम्ही सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहोत. पारदर्शकता आमची प्राथमिकता आहे. EVM हॅक होत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. सर्वोच्च न्यायालयानं देखील हे स्पष्ट केलं आहे. त्यानंतर EVM वर संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला आहे.

मतदानाच्या एक आठवडा आधी EVM तयार होते. पोलिंग एजंटच्या समोर EVM सिल केले जाते. मतदान संपल्यानंतर EVM सील होते. ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शी आहे. 

' आरोप और इल्जामात का दौर चले, कोई गिला नहीं; झूठ के गुब्बारों को सहारा मिलें, कोई शिकवा नहीं; हर नतीजे में प्रमाण दिया गया है; पर वो ना सबूत शक की नई दुनिया खोजते हैं और शक का इलाज तो हकीम लुकमान के पास भी नहीं!

ईव्हीएम हे फुलप्रूफ डिव्हाईस आहे. त्यामध्ये कोणताही व्हायरस जाऊ शकत नाही. पारदर्शक निवडणूक ही आमची प्राथमिकता आहे. ईव्हीएममध्ये अवैध मतदान शक्य नाही. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com