Election News: बोगस वोटींग, हाणामारी, लाठीचार्ज, पैसे वाटप अन् राडा! राज्यात मतदाना वेळी कुठे काय घडलं?

त्यामुळे सर्वच जण आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळेले. त्यातूनच अनेक ठिकाणी राडा झाल्याचंही दिसून आलं आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • महाराष्ट्रातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी 12 हजार 316 मतदान केंद्रांवर आज मतदान करण्यात आले
  • मतदानादरम्यान अनेक ठिकाणी बोगस वोटिंग, हाणामारी, लाठीचार्ज, पैसे वाटप आणि राडा यांसारख्या घटनांची नोंद झाली
  • बीड, डहाणू, बदलापूर, गेवराई, इंदापूर, रायगड, सांगली या जिल्ह्यांमध्ये मोठे संघर्ष आणि हिंसाचार.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान झाले.  264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी हे मतदान झाले.  यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली होती. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांवर हे मतदान झाले. पण अनेक ठिकाणी मतदाना वेळी गालबोट लागले. बोगस वोटींग, हाणामारी, लाठीचार्ज, पैसे वाटप अन् राडा असेच चित्र दिवसभर मतदाना दरम्यान पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्ष ताकदीने उतरले होते. त्यामुळे सर्वच जण आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळेले. त्यातूनच अनेक ठिकाणी राडा झाल्याचंही दिसून आलं आहे. 

बीड जिल्ह्यात पैसे वाटप  
बीडच्या माजलगाव मध्ये काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये पैसे वाटल्याचे आरोपावरून दोन गटाने सामने आले होते. त्यामुळे जोरदार राडा झाला. माजलगाव शहरात वार्ड क्रमांक पाच मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हा वाद विकोपाला गेला होता. पोलीसांनी या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाना शांत केले. तर बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक झाल्याची घटना घडली. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. मतदान सुरू असताना बीड शहरातील शाहूनगर भागात ही घटना घडली. 

नक्की वाचा - Raigad Rada News: रायगडमध्ये मोठा राडा! भरत गोगावलेंच्या मुलावर रिव्हॉल्वर रोखली? गाडी फोडली, नेमकं काय घडलं?

डहाणूत शिवसेना भाजप कार्यकर्ते भिडले 
डहाणूत मतदान केंद्राबाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचा राजेंद्र माच्छी यांचा आरोप होता. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी यावेळी आक्रमक झाले होते. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 11 मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची एकमेकांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद नियंत्रणात आला. 

बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत ही वाद 
बदलापूर पोलीस ठाण्या बाहेर  दोन गटात राडा झाला.  भाजप आणि शिवसेना शिंदे गटात हा तुफान राडा झाला. भाजप उमेदवार रमेश सोळसे त्यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर झाला राडा झाला. वाद मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लाठी चार्ज केला. त्यानंतर गर्दी पांगवण्यात आली.  प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उभा असताना मुलाला मारहाण करत असल्याचा जाब विचारल्याने झाला राडा झाला.  शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निशा ठाकरे या ठिकाणी भाजप उमेदवार विरुद्ध उमेदवारी लढत आहे. या राड्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Nagar Panchayat, Nagar Parishad Election Result: मतमोजणी लांबणीवर पडण्याचे नेमके कारण काय?

गेवराईत लाठ्या काठ्या घेवून हल्ला 
गेवराईतही अशीच स्थिती पाहायला मिळाली. लाठ्या काठ्या घेऊन दोन गटातील समर्थक आमने सामने आले होते. दोन्ही गटातून किरकोळ दगडफेक झाली. आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने-सामने आले होते. गेवराई तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

इंदापूरमध्ये मतदान केंद्रावर  गोंधळ
पुण्याच्या इंदापूर मध्ये मतदान केंद्रावर दोन्ही गटात आपापसात गोंधळ झाला होता. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद तात्काळ मिटवण्यात आलाय. इंदापूर शहरातील नगरपरिषदे शेजारी प्राथमिक शाळा क्रमांक दोन या ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रावर हा गोंधळ झाला होता. 

Advertisement

नक्की वाचा: नगरपंचायत-नगरपरिषद उद्या होणारी मतमोजणी रद्द

जिंतूरमध्ये बोगस मतदान
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघात आज नगरापरिषदेच्या मतदान दरम्यान जिल्हा परिषद शाळेमधे गोंधळ उडाला. काही नागरिकांनी बोगस मतदान होतं असल्याचा आरोप केला आहे. तर वयवृद्ध नागरिकांना मारहाण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सर्व गोंधळात पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्तिथी नियंत्रणात आणली. त्यानंतर निवडणूक प्रक्रीया सुरळीत झाली. या मतदाना दरम्यान मोठ्या प्रमाणात बोगस वोटींग झाल्याचा आरोप परस्पर विरोधी गट करत आहेत. 

महाडमध्ये तटकरे- गोगावले समर्थक भिडले
रायगडमध्ये भरत गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाल्याचं समोर आलं. गोगावले समर्थकांकडून सुशांत जाबरे याला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी बंदूकही बाहेर काढल्याचं पाहायला मिळालं. 

Advertisement

नक्की वाचा: भाजप विरुद्ध सेना संघर्ष पेटला! मध्यरात्री निलेश राणेंचा पोलिस स्टेशनमध्ये राडा

सांगलीतल्या तासगावमध्ये दोन पाटील भिडले 
सांगलीतही राडा झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार रोहीत पाटील आणि संजय काका पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकां समोर आले होते. हे कार्यकर्ते भिडले होते. यावेळी आमदार रोहित पाटील यांना धक्काबूक्की करण्याचा प्रयत्न ही करण्यात आला.  तासगाव नगरपालिका निवडणूक मतदाना वेळी ही घटना घडली आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

नक्की वाचा - Maharashtra Local Body Election Live Updates: सांगलीत राडा, रोहीत पाटील- संजय काकांचे कार्यकर्ते भिडले