जाहिरात

Breaking News: नगरपंचायत-नगरपरिषद उद्या होणारी मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकाल कधी लागणार?

Election Result 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडला आहे. सर्व निवडणुकांचा एकत्रित निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे.

Breaking News: नगरपंचायत-नगरपरिषद उद्या होणारी मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकाल कधी लागणार?

Election 2025 : नरगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. उद्या म्हणजेच 2 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडला आहे. सर्व निवडणुकांचा एकत्रित निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

निकाल लांबणीवर का पडला? 

निवणुकीदरम्यान 24 नगरपालिका आणि 154 सदस्यांच्या निवडणीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. कायदेशीर पेच निर्माण झाल्याने निवडणूक आयोगाने या प्रभागांमधील निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र उद्या होणारी मतमोजणी एकत्रित 21 डिसेंबर रोजी घेतली जाऊ शकते का? अशी विचारणा हायकोर्टाच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे केली होती. यावर हा निकाल आला आहे. 

(नक्की वाचा-  दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; MMRDA चा नवा प्रकल्प ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक कोंडी फोडणार)

मुख्यमंत्री काय म्हणाले? 

कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो मान्यच करावा लागले. पण कोर्टात गेल्या काही काळात ही जी पद्धती वापरली जात आहे ते योग्य वाटत नाही. निवडणूक आयोगाने यात सुधार आणला पाहिजे. त्यांना अनेक निवडणुका घ्यायच्या आहेत. जो काही कायदा आहे त्याचे चुकीचे इंटरप्रिटेशन करण्यात आले, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.  

ज्या लोकांनी कोर्टात धाव घेतली, त्या ठिकाणी त्यानाही दिलासा दिला नाही. हे खूप चुकीचे आहे. मी कालही माझी नाराजी दर्शवली आहे. सगळी प्रक्रिया कायदेशीर होत नाही यावर मी नाराज आहे. सगळी मतमोजणी थांबवणे योग्य नाही. लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. आपण कसे वागतो काय संकेत देतो यांचा विचार केला पाहिजे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com