काँग्रेस पक्षाची पूर्वीपासूनच आरक्षण विरोधी मानसिकता आहे. त्यांच्या वृत्तपत्रातील जुन्या जाहिराती सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्या पाहा. काँग्रेस पक्षानं उघडपणे आरक्षणाला विरोध केला आहे. आजही काँग्रेसचा अजेंडा आणि मानसिकता तीच आहे. त्यामुळेच त्यांना गेली दहा वर्ष या देशाचा पंतप्रधान OBC असल्याचं सहन होत नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमधील सभेत ते बोलत होते. सर्वांनी एक राहा अन्यथा काँग्रेस आरक्षण समाप्त करेल, असा इशाराही त्यांनी या सभेत दिला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संभाजी महाराज विरुद्ध औरंगजेब
'एकीकडं संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त आहेत, दुसरिकडं औरंगजेबाजं गुणगाण करणारे लोकं आहेत. छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आघाडी सरकारच्या कार्यकाळातील अडीच वर्षात ते काँग्रेसच्या दबावात पूर्ण झालं नाही. आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली,' असं पंतप्रधानांनी या सभेच्या सुरुवातीलाच सांगितलं. ज्यांना संभाजी महाराजांच्या नावात आपत्ती, ज्यांना त्यांची हत्या करणारा स्वत:चा मसीहा वाटतो ते महाराष्ट्र, आणि मराठी स्वाभिमानाच्या विरोधात उभे आहेत, असा आरोप त्यांनी केला.
( नक्की वाचा : Explained : निवडणूक प्रचारात PM मोदी शरद पवारांवर टीका करणे का टाळत आहेत? )
मराठवाड्याला काय फायदा होणार?
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महायुती सरकारच्या कामांचा पाढा वाचला. या विकासकामाचा महायुती आणि मराठवाड्याला फायदा होणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला विकसित भारताच्या व्हिजनचं नेतृत्त्व करायचं आहे. भाजपा आणि महायुती त्याच दिशेनं काम करत आहे. समृद्धी महामार्ग संभाजीनगर जिल्ह्यातून जातो. मराठवाडा, विदर्भ मुंबईशी थेट जोडला आहे. जळगाव, धुळे, सोलापूरशी महामार्ग कनेक्ट करण्याचं काम सुरु आहे. या संपूर्ण क्षेत्रात रेल्वेचं आधुनिक करण्याचं काम केलं जातं आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. त्याचा फायदा तुम्हाला होत आहे.
आगामी काळात अनेक मोठ्या कंपन्या आपल्याकडं काम करणार आहे. त्यासाठी राज्यातील मोठा इंडस्ट्रीयल पार्क होत आहे. जास्त गुंतवणूक, जास्त कंपन्या म्हणजे संभाजीनगर आणि मराठवाड्यातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार, असं मोदींनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास )
.... तुम्हाला पाण्यासाठी तहानलेले ठेवतील
पालखी महामार्ग, मराठीला अभिजात भाषा देण्याचती मागणी भाजपानंच पूर्ण केलं आहे. आघाडीनं महाराष्ट्राच्या अडचणी वाढवण्याशिवाय काहीही काम केलं नाही. मराठवाड्यात बऱ्याच काळापासून पाणी संकट सहन केलंय. पण, काँग्रेस आणि आघाडी हातावर हात ठेवून बसले होते. आम्ही दुष्काळाच्या विरोधात पहिल्यांदा काम सुरु केलं, वैतरणा, उल्हास नदीचं पाणी मराठवाड्यात देण्याचं काम सुरु केलं. फडणवीस सरकारनं जलयुक्त शिवार योजना सुरु केली. आघाडी सरकारनं त्यालाही ब्रेक लावला. छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठ्यासाठी 1600 कोटी दिले होते. त्यालाही आघाडी सरकारनं ब्रेक लावला. ही योजना पुन्हा सुरु केली तर त्याची किंमत खूप वाढली. त्यासाठी केंद्र सरकार 700 कोटी अतिरिक्त देत आहे. हा महायुती आणि आघाडीमधील फरक आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
आघाडीचे लोकं थेंब-थेंब पाण्यासाठी तुम्हाला त्रास देतील. त्यांना संधीच देऊ नका. अन्यथा ते तुम्हाला पाण्यासाठी देखील तहानलेले ठेवतील, अशी टीका मोदींनी केली. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारनं सादर केलेल्या योजना देखील त्यांनी यावेळी सांगितला.
काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात
काँग्रेस दलित, मागासवर्ग यांचा पुढं जाण्यापासून रोखते, कारण सत्तेवर पिढ्यानपिढ्या त्यांचा कब्जा राहिल. सध्या इंटरनेटवर जुन्या पेपरची फोटो व्हायरल होत आहेत. आरक्षणाबाबत काँग्रेसची खरी भूमिका काय आहे हे या जाहिरातीमधून पाहून लोकं चर्चा करत आहेत.
काँग्रेस पक्ष आरक्षणाला देशाच्या विरोधात सांगत होता. काँग्रेसची मानसिकता,अजेंडा आजही तोच आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून ओबीसी समाजाचा पंतप्रधान त्यांना सहन होत नाही. त्यामुळेच काँग्रेसचे शहजादे विदेशात जाऊन आरक्षण समाप्त करणार अशी जाहीर घोषणा करतात. ओबीसीत फुट पडली तर आपला फायदा होईल, अशी काँग्रेसची समजूत आहे. काँग्रेसला सत्ता मिळाली तर ते SC, ST, OBC आरक्षण बंद करतील. त्यामुळे जागरुक राहा. लक्षात ठेवा 'एक है तो सेफ है', असं आवाहन त्यांनी केलं.
मराठवाड्यानं नेहमीच देशाच्या अंखडतेसाठी बलिदान दिलं आहे. महाराष्ट्रासाठी देशभक्ती सर्वोच्च आहे. पण काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा 370 कलम लागू करण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसनं हे विधेयक रद्द करण्यास संसदेत विरोध केला. कोर्टात वकिल देऊन रात्र-दिवस प्रयत्न केले. पण, काश्मीर भारतचा अभिभाज्य भाग आहे. काश्मीारमध्ये बाबासाहेबांचं संविधान असावं हा प्रत्येक देशवासियांचा संकल्प आहे. पण, हे संविधान काश्मीरमधून रद्द व्हावं हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ही पाकिस्तानची भाषा आहे. ती बोलणाऱ्या काँग्रेस आणि सहकाऱ्यांना धडा शिकवा.
आपल्याला महाराष्ट्रात मजबूत सरकार आवश्यक आहे, त्य़ामुळे जास्तीत जास्त महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा, असं आवाहन पंतप्रधानांनी सभेच्या शेवटी केलं.