'मी पुन्हा येईन म्हणणारे पुन्हा येत नाही, अन् उपमुख्यमंत्री झालेले मुख्यमंत्री होत नाहीत'

Advertisement
Read Time: 2 mins
लातूर:

सुनील कांबळे

तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात 11 मतदार संघात 7 मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदार संघात प्रचाराची राळ उठली आहे. लातूर लोकसभेत अमित देशमुख यांनी काँग्रस उमेदवाराच्या विजयासाठी कंबर कसली आहे. लातूरमधून काँग्रेसने डॉ. शिवाजी कांगळे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारा दरम्यान देशमुख बंधुनी जोरदार फटकेबाजी केली आहे. त्यामुळे लातूरच्या निवडणुकीत रंगत भरली आहे. त्यात माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलेल्या विधानाने तर वातावरण चांगलेच तापले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमित देशमुखांची फटकेबाजी 

डॉ. शिवाजी कांगळे यांच्यासाठी अमित देशमुखांची लातूरमध्ये सभा होती. या सभेत देशमुख यांनी आपल्या खास देशमुखी शैलीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. एखादा उपमुख्यमंत्री झालेली व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री होत नाही असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. असं वक्तव्य करत अमित देशमुखांनी फडणवीसांना टोला लगावला. देशमुख इथेच थांबले नाहीत. देशात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार येणार. राज्यात एक मु्ख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे काय जनतेला पटलेले नाही. त्यामुळे महायुतीचे सरकार पुन्हा येणार नाही असेही देशमुख म्हणाले. मी पुन्हा येईन असं  म्हणणारे सुद्धा पुन्हा येत नसतात, असं म्हणत अमित यांनी फडणवीसांना लक्ष केल. 

हेही वाचा - पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?

इतिहास काय सांगतो? 

अमित देशमुख यांनी उपमुख्यमंत्री झालेली व्यक्त पुन्हा मुख्यमंत्री होत नाही हे वक्तव्य केले आहे. त्यात खरोखर किती तथ्य आहे हे पहावे लागेल. राज्याच्या इतिहासात आता पर्यंत नाशिकराव तिरपूडे, सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपिनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर.आर. पाटील, अजित पवार हे आता पर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून राहीले आहेत. यातील एकालाही आता पर्यंत मुख्यमंत्री होता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. शिंदे सरकारमध्ये सध्या देवेंद्र फडणवीसही उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.  

लातूरमध्ये काँग्रेस विरूद्ध भाजप 

लातूर लोकसभेसाठी 7 मे ला मतदान होत आहे. हा मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा गड होता. मात्र 2014 नंतर या गडाला तडा गेला. या मतदार संघात भाजपने पुन्हा एकदा सुधाकर श्रंगारे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर काँग्रेसने डॉ. शिवाजी कांगळे यांना मैदानात उतरवले आहे. शिवराज पाटील असतील विलासराव देशमुख असतील त्यांनी ही जागा सतत काँग्रेससाठी राखली होती. आता ती जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर आहे. त्यामुळे देशमुखांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे.  

Advertisement