राहुल गांधींची तब्येत अचानक बिघडली; मध्य प्रदेश, झारखंड दौरा रद्द

काँग्रेसचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष जीत पटवारी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर ही माहिती दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचे आजचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले. राहुल गांधी आज मध्य प्रदेशमधील सतना आणि झारखंडच्या रांची दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या जागी आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सतना दौऱ्यावर जातील. 

काँग्रेसचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष जीत पटवारी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, 'राहुल गांधी त्यांचा तब्येत बिघडल्याने ते आज सतना येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी आज मल्लिकार्जुन खरगे सतना येथे येतील. काँग्रेस अध्यक्ष सतनाचे काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ कुशवाहा यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या सभेत सहभागी होती. राहुल गांधी देखील लवकरच राज्यातील प्रचारात सहभागी होती आणि जनतेशी संवाद साधतील.'

<

(नक्की वाचा-  अकोला मतदारसंघ : तिरंगी लढतीमध्ये इतिहास बदलण्याचं आंबेडकरांसमोर आव्हान)

रांची येथे आज इंडिया आघाडीची मेगा रॅली पार पडत आहे. राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन देखील या रॅलीत सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. एकूण 28 पक्षांचे नेते या रॅलीत सहभागी होणार आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा - अमरावतीत विरोधकांची एकी, वाढवणार नवनीत राणांची डोकेदुखी?)

मल्लिकार्जुन खरगे, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, तृणमूलचे खासदार डेरेन ओब्रायन, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे दीपांकर भट्टाचार्य देखील या रॅलीत सहभागी होतील. या रॅलीत पाच लाखांपर्यंत लोक सहभागी होतील असा अंदाज आहे. 

Topics mentioned in this article