काँग्रेसची दुसरी यादी आली, 'या' बड्या नेत्यांना पुन्हा संधी, तर वादग्रस्त जागांवरही उमेदवार

काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसने आपले 71 उमेदवार जाहीर केले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत एकूण 23 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसने आपले 71 उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत आपल्या बड्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. त्यात जालन्यातून कैलास गोरंट्याल तर माजी विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाय ज्या जागेवरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात वाद झाला होता त्या नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवारीचीही काँग्रेसने घोषणा केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत बहुतांश उमेदवार हे विदर्भातील आहे. सावनेर विधानसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिथे अपेक्षे प्रमाणे काँग्रेस नेते सुनिल केदार यांच्या पत्नी अनुजा सुनिल केदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आर्णी येथून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा मुलगा जितेंद्र मोघे यास पक्षाने मैदानात उतरवले आहे. तर कामठी येथून सुरेश भोयर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी दोन वेळा ते पराभूत झाले होते. या शिवाय राळेगावमधून प्रोफेसर वसंत पुरके यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाची दुसरी यादी आली, काँग्रेसने दावा केलेल्या 'त्या' जागेवरही उमेदवाराची घोषणा

भंडारा या अनुसूचित जाती आरक्षित जागेवर पूजा ठवकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अर्जुनी मोरगाव येथून राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनसोड यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आमगाव येथून विद्यमान आमदार काँग्रेसचे सहसराम कोरोटे यांच्या ऐवजी राजकुमार पुराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांच्या बरोबर होणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, संगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत दक्षिण नागपूर येथून गिरीश पांडव यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. येथून महा विकास आघाडीतील उबाठा पक्ष निवडणूक लढविण्यास आग्रही होता. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात याच जागेवरून खटके उडाले होते. अखेर ती जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे. या शिवाय काँग्रेसने मुंबईतल्या तिन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात सायन कोळीवाडा, कांदिवली पूर्व आणि चारकोप मतदार संघाचा समावेश आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने

जालना विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. इथे त्यांची लढत शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांच्या बरोबर होणार आहे. तर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातून मधुकर देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वसईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असून इथून विजय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील. काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत विद्यमान आमदारांबरोबर नेत्यांच्या नातेवाईकांनाही संधी देण्यात आली आहे.