अजित पवार सर्वांच्या नजरेत खलनायक व्हावेत यासाठी शरद पवाराचं पुढाकार घेत होते असा गौप्यस्फोट कृषी मंत्री धननंजय मुंडे यांनी केला आहे. बारामती लोकसभेत इंदापूर इथल्या प्रचार सभेत ते बोलत होते. बोलताना मात्र त्यांनी थेट शरद पवारांचे नाव घेतले नाही. शिवाय भाजपबरोबर जाण्याचा जो निर्णय होता त्याची कल्पनाही अजित पवारांना नव्हती. त्या बैठकीत ते नव्हते, अशी माहिती ही मुंडे यांनी दिली. अनेक गोष्टींचा मी साक्षिदार आहे. अजित पवारांना खुप सहन करावं लागलं असेही ते म्हणाले. त्यांच्या या आरोपांना आता शरद पवार गटाकडून काय उत्तर येतं ते पहालं लागेल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
पहाटेचा शपथविधी अन् 'ती' बैठक
अजित पवारांबरोबर अनेक गोष्टी झाल्या. त्याचे आपण साक्षिदार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दादांना ज्या पद्धतीने भोगावे लागलं त्या पद्धतीने मला देखील अनेक गोष्टी भोगावे लागल्या. देशांमध्ये गणपती बसले होते. त्याच रात्री जेवणा बरोबर बैठक झाली. भाजपबरोबर जाण्याचे ठरले होते. त्यावेळी जिल्हे मंत्रीपद, पालकमंत्री पद ठरलं होतं. त्या बैठकीला दादा नव्हते. त्यांना माहितीही नव्हतं. पण दादांना खलनायक केलं गेलं. पुढचा घटनाक्रम सर्वांना माहितच आहे. असा गौप्यस्फोटही धनंजय मुंडे यांनी केला.
हेही वाचा - 'गब्बर सिंग ते गुंडांचा पोशिंदा' भास्कर जाधवांचं कोकणातलं भाषण गाजलं, आता वाद पेटणार?
पुलोद वेळी काय केलं?
पुलोदचे सरकार भाजप बरोबर स्थापन केले होते. त्यावेळी ते संस्कार का असा प्रश्न मुंडे यांनी शरद पवारांना केला. मात्र तुमच्याच समहमतीने 2019 चा पहाटेचा शपथविधी झाला होता. याबाबत अजित पवार काहीच बोलले नाहीत. पण यामागे शरद पवारचं होते असेही मुंडे म्हणाले. सर्व गोष्टींची दादांनी कधी ब्र शब्द काढला नाही. दादांना हृदय नाही की भावना नाहीत. तिथे देखील दादांना तोंडावर पाडले. दादा खलनायक झाले. दादांकडे वाकड्या दृष्टीने पहावं ते खलनायक व्हावेत या दृष्टीनेच राजकारण केलं गेले असा आरोप मुंडेंनी केला.
सुनेत्रा पवार मुळच्या बारामतीच्याच
सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिव मधील तेर गावात झाला. मात्र सुनेत्रा वहिनींचे वडील बाजीराव पाटील हे मूळचे बारामती तालुक्यातील वडगावचे. त्या मुळच्या बारामतीच्या पण तीच लेक सून म्हणून आली की परकी झाली, असा सवाल करत मुंडेंनी शरद पवारांना लक्ष्य केलं.