कोकणात प्रचाराचे धुमशान सुरू आहे. राणें विरुद्ध सारे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने तर राणें विरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते आणि फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी भर टाकली आहे. त्यांनी यावेळी राणें ऐवजी थेट त्यांच्या प्रचाराला येणाऱ्या केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्य नाथ यांनाच लक्ष केले आहे. जाधव यांनी या दोन्ही नेत्यांवर केलेल्या टिकेमुळे कोकणात हा वाद पेटणार हे मात्र निश्चत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
चिपळूणची सभा जाधवांनी गाजवली
शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी चिपळूणमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. ही सभा भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणाने गाजवली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अमित शहा यांचा उल्लेख गब्बरसिंग असा केला. तर आदित्यनाथ हे गुंडांचे पोशिंदे असल्याचे म्हणाले. त्यांच्या बरोबर जवळपास पाच पंचविस हजारांची गुंडांची फौज असल्याचा आरोही त्यांनी केला. ते कोकणात प्रचाराला येत आहेत. पण कोकणी माणूस त्यांना पाणी पाजल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अमित शहांची मिमिक्रीही करून दाखवली. त्यावेळी सभेत एकाच वेळी टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला.
हेही वाचा - 'भुजबळांना ताटकळत ठेवलं, हा ओबीसीचा अपमान' महायुतीत घमासान
विनायक राऊत खाशाबा जाधव
यावेळी त्यांनी विनायक राऊत यांचे कौतक केले. विनायक राऊत यांच्या देहयष्टीकडे जाऊ नका. ते आमचे खाशाबा आहेत. आणि गरज लागली तर मी जाधव आहेच. असा उल्लेख करत त्यांनी विनायक राऊत यांना कोकणचे खाशाबा जाधव म्हणाले. ते राणेंना चितपट करणार हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा उद्धव ठाकरेंना गरज होती त्यावेळी विनायक राऊत आणि भास्कर जाधव हे दोघेही त्यांच्या बरोबर प्रामाणिक पणे राहीले. आमचा स्वभाव लढणाऱ्याचा आहे. त्यामुळे जनताही आमच्याबरोबर आहे असेही जाधव यावेळी म्हणाले. त्यामुळे विजय हा निश्चित आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.
'शिंदे फडणवीस मला घाबरतात'
यावेळी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. मी विधानसभेत बोलतो तेव्हा शिंदे दाडी खाजवतात. तर फडणवीस खाली बघतात. गेल्या चाळीस वर्षात आपल्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यामुळे ही लोक आपले काही वाकडे करू शकत नाही असेही ते म्हणाले. जर कोणी अंगावर आला तर सोडत नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world