मोठी बातमी : धाराशिवमध्ये मतदानाला रक्तरंजित गालबोट; शिवसैनिक ठार

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

जाहिरात
Read Time: 1 min
धाराशिव:

प्रतिनिधी, अझरुद्दीन शेख

हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि मविआचे उमेदवार सत्यशिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली असताना आता धाराशिवमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.  धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे राजकीय वैमनस्यातून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता. शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याची माहिती सांगितली जात आहे. या हल्ल्यात एका तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तीन ते चारजणं जखमी झाले आहेत. 

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी मतदान केंद्रावर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे गटाचे कार्यकर्ते मतदारांना घेऊन आले होते. काही कारणास्तव दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. या गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. समाधान नानासाहेब पाटील असं हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्याचं नाव आहे. समाधान हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाच ते सहा कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन ते चार कार्यकर्त्यांवर या राजकीय  गटाच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. 

बातमी अपडेट होत आहे.