धुळ्यात मतदानाचा उत्साह; 92 वर्षाच्या आजीबाई वनिता पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क

धुळे शहरात सकाळपासून मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहायला मिळत असून 92 वर्षीय वनिताबेन पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Advertisement
Read Time: 1 min
धुळे:

धुळे शहरात सकाळपासून मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहायला मिळत असून 92 वर्षीय वनिताबेन पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 92 वर्षे आजींकडे पाहून मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. 

धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून सर्व मतदार बांधवांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचा प्रत्यय आज प्रत्यक्षात बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा अधिकार बजावत आहेत. त्यामध्ये नवतरुण मतदारांची संख्या देखील विशेष असून वृद्ध मतदार देखील मागे नाही. 92 वर्षाच्या वनिता बेन पटेल आजीबाईदेखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आपल्या मुलासोबत मतदान केंद्रावर आल्या होत्या. 

नक्की वाचा - LIVE UPDATE: इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा मतदानाचा टक्का कमीच

तसेच यावेळी त्यांच्या मुलाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमच्या आई वनिताबेन पटेल या 92 वर्षाच्या असून त्यांनी या वयात आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यामुळे यांची प्रेरणा घेऊन धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधु आणि भगिनींनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.