जाहिरात
Story ProgressBack
24 days ago
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज ( सोमवार, 20 मे) मतदान झालं.  7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशासह 49 लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण झालं. महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरी 48.96 टक्के मतदान झालं आहे. 

महाराष्ट्रात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघांत या टप्प्यात मतदान झालं. त्याचबरोबर आता राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे.

पाचव्या टप्प्यात उत्तर पदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहार आणि ओडिसातील पाच-पाच, झारखंड-जम्मू काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एक जागेवर मतदान झालं.

या टप्प्यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून राहुल उमेदवार आहेत. त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह-लखनौ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी - अमेठी, केंद्रीय मंत्री कौशल किशोर - मोहनलालगंज, केंद्रीय मंत्री भानु प्रताप सिंह वर्मा - जालौन, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती - फतेहपूर यांचंही भवितव्य बंद झालं आहे. 

May 20, 2024 20:30 (IST)
Link Copied

राज्यात पाचव्या टप्प्यात किती मतदान?

राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 48.96 टक्के मतदान झालं आहे. मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहूया

धुळे - 48.81 %

दिंडोरी - 57.06 %

नाशिक - 51.16 %

पालघर - 54.32 %

भिवंडी - 48.89 %

कल्याण - 41.70 %

ठाणे - 47.56 %

मुंबई उत्तर - 46.91 %

मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 %

मुंबई उत्तर पूर्व - 48.67 % 

मुंबई उत्तर मध्य - 47.46 %

मुंबई दक्षिण मध्य - 48.80 %

मुंबई दक्षिण - 44.63 %

May 20, 2024 17:43 (IST)
Link Copied

राज्यात 5 वाजेपर्यंत किती मतदान?

राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान झालं आहे. मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहूया

धुळे - 48.81 %

दिंडोरी - 57.06 %

नाशिक - 51.16 %

पालघर - 54.32 %

भिवंडी - 48.89 %

कल्याण - 41.70 %

ठाणे - 45.38 %

मुंबई उत्तर - 46.91 %

मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 %

मुंबई उत्तर पूर्व - 48.67 % 

मुंबई उत्तर मध्य - 47.32 %

मुंबई दक्षिण मध्य - 48.26 %

मुंबई दक्षिण - 44.22 %

May 20, 2024 16:46 (IST)
Link Copied

'निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरु आहे'

मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह आहे. पण, निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरु आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

मतदान झाल्याशिवाय केंद्रातून बाहेर जाऊ नका. पहाटे पाच वाजले तरी मतदान करा. पराभवाच्या भीतीनं निवडणूक आयोगाचा नवा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

May 20, 2024 15:45 (IST)
Link Copied

देशात सर्वात कमी महाराष्ट्रात मतदान

देशभरात दुपारी 3 वाजेपर्यंत 47.53 टक्के मतदान झालं आहे. 

बिहार - 45.33 %

जम्मू आणि काश्मीर - 44.90 % 

झारखंड - 53.90 %

लडाख -61.26 %

महाराष्ट्र - 38.77 %

ओडिसा - 48.95 %

उत्तर प्रदेश - 47.55 %

पश्चिम बंगाल - 62.72 %

May 20, 2024 15:42 (IST)
Link Copied

दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती मतदान?

दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 38.77 % मतदान झालं आहे. दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक तर कल्याण लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत सर्वात कमी मतदान झालं आहे. मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहूया

धुळे - 39.97 %

दिंडोरी - 45.95 %

नाशिक - 39.11 %

पालघर - 42.48 %

भिवंडी - 37.06 %

कल्याण - 32.43 %

ठाणे - 36.07 %

मुंबई उत्तर - 39.33 %

मुंबई उत्तर पश्चिम - 39.91 %

मुंबई उत्तर पूर्व - 39.15 % 

मुंबई उत्तर मध्य - 37.66 %

मुंबई दक्षिण मध्य - 38.77 %

मुंबई दक्षिण - 36.64 %

May 20, 2024 13:46 (IST)
Link Copied

पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यत लडाखमध्ये सर्वाधिक मतदान

पाचव्या टप्प्यातील देशभरातील दुपारी 1 वाजेपर्यंत आकडेवारी

बिहार - 34.62 %

जम्मू आणि काश्मीर - 34.79 % 

झारखंड - 41.89 %

लडाख -52.02 %

महाराष्ट्र - 27.78 %

ओडिसा - 35.31 %

उत्तर प्रदेश - 39.55 %

पश्चिम बंगाल - 48.41 %

May 20, 2024 13:40 (IST)
Link Copied

दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 27.78 % मतदान, कल्याणमध्ये सर्वात कमी

दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 27.78 % मतदान

धुळे - 28.73 %

दिंडोरी - 33.25 %

नाशिक - 28.51 %

पालघर - 31.06 %

भिवंडी - 27.34 %

कल्याण - 22.52 %

ठाणे - 26.05 %

मुंबई उत्तर - 26.78 %

मुंबई उत्तर पश्चिम - 28.41 %

मुंबई उत्तर पूर्व - 28.82 % 

मुंबई उत्तर मध्य - 28.05 %

मुंबई दक्षिण मध्य - 27.21 %

मुंबई दक्षिण - 24.46 %

May 20, 2024 13:34 (IST)
Link Copied

मतदारांना आकर्षित करण्यासाठी पर्यावरण पूरक मतदान केंद्राची उभारणी

नवी मुंबईतील नेरुळमधील तेरणा विद्यालयात मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोग व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून पर्यावरण पूरक मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या करिता नवी मुंबई महानगरपालिका नेरूळ विभागाच्या वतीने 'माझी वसुंधरा' या शासनाच्या संकल्पनेचा अवलंब करून येणाऱ्या नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. मतदान करून जास्तीत जास्त झाडे लावा व सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळा अशा स्वरूपाचा संदेश देत हे पर्यावरण पूरक मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

May 20, 2024 13:27 (IST)
Link Copied

सचिन तेंडूलकरने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

May 20, 2024 13:04 (IST)
Link Copied

गुलजार यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि माध्यमांशी संवाद साधला...

May 20, 2024 12:45 (IST)
Link Copied

पवई हिरानंदानीत अनेक EVM बंद असल्याचा आरोप, आदेश बांदेकरांनी शेअर केला व्हिडिओ

पवई हिरानंदानीत अनेक EVM बंद असल्याचा आरोप, आदेश बांदेकरांकडून व्हिडिओ पोस्ट करून आरोप

May 20, 2024 12:27 (IST)
Link Copied

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघात मतदानासाठी मोठी रांग

May 20, 2024 11:55 (IST)
Link Copied

पाचव्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये...

पाचव्या टप्प्यातील देशभरातील सकाळी 11 वाजेपर्यंत अंदाजे आकडेवारी

बिहार - 21.11 %

जम्मू आणि काश्मीर - 21.37 % 

झारखंड - 26.18 %

लडाख -27.87 %

महाराष्ट्र - 15.93 %

ओडिसा - 21.07 %

उत्तर प्रदेश - 27.76 %

पश्चिम बंगाल - 32.70 %

May 20, 2024 11:38 (IST)
Link Copied

महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान

सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 15.93 % मतदान

धुळे - 17.38 %

दिंडोरी - 19.50 %

नाशिक - 16.30 %

पालघर - 18.60 %

भिवंडी - 14.79 %

कल्याण - 11.46 %

ठाणे - 14.86 %

मुंबई उत्तर - 14.71 %

मुंबई उत्तर पश्चिम - 17.53 %

मुंबई उत्तर पूर्व - 17.01 % 

मुंबई उत्तर मध्य - 15.73 %

मुंबई दक्षिण मध्य - 16.69 %

मुंबई दक्षिण - 12.75 %

May 20, 2024 11:10 (IST)
Link Copied

राज ठाकरेही मतदानासाठी कुटुंबासह मतदान केंद्रावर पोहोचले

May 20, 2024 10:45 (IST)
Link Copied

अभिनेत्री हेमा मालिनीसह मुलगी इशा देओल मतदान केंद्रावर

May 20, 2024 10:20 (IST)
Link Copied

आधी मतदानाचं कर्तव्य बजावा, नंतर सुट्टीचा आनंद घ्या - रेणुका शहाणे

May 20, 2024 10:12 (IST)
Link Copied

पालघर मतदारसंघात विक्रमगडमधून सर्वाधिक मतदान

पालघर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे 7.95 टक्के मतदान

 पालघर जिल्ह्यातील  विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी

डहाणू – 8.16 टक्के

विक्रमगड – 9.70 टक्के

पालघर – 9.20 टक्के

बोईसर – 6.31 टक्के

नालासोपारा – 6.50 टक्के

वसई – 9.40 टक्के

May 20, 2024 10:10 (IST)
Link Copied

अभिनेत्री स्पृहा जोशीने बजावला मतदानाचा हक्क

May 20, 2024 10:02 (IST)
Link Copied

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी टक्के मतदान

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी टक्के मतदान

पाचव्या टप्प्यातील देशभरातील सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे आकडेवारी

बिहार - 8.86 %

जम्मू आणि काश्मीर - 7.63 % 

झारखंड - 11.68 %

लडाख -10.51 %

महाराष्ट्र - 6.33 %

ओडिसा - 6.87 %

उत्तर प्रदेश - 12.89 %

पश्चिम बंगाल - 15.35 %

May 20, 2024 09:45 (IST)
Link Copied

मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकांचं ठिय्या आंदोलन

मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकांचं ठिय्या आंदोलन

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला. याशिवाय ठिय्या आंदोलन केलं. 

May 20, 2024 09:41 (IST)
Link Copied

महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 % मतदान

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान...

सकाळी 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात अंदाजे 6.33 % मतदान

धुळे - 6.92 %

दिंडोरी - 6.40%

नाशिक - 6.45 %

पालघर - 7.95 %

भिवंडी - 4.86 %

कल्याण - 5.39%

ठाणे - 5.67 %

मुंबई उत्तर - 6.19 %

मुंबई उत्तर पश्चिम - 6.87 %

मुंबई उत्तर पूर्व - 6.83 % 

मुंबई उत्तर मध्य - 6.01 %

मुंबई दक्षिण मध्य - 7.79 %

मुंबई दक्षिण - 5.34

May 20, 2024 09:30 (IST)
Link Copied

नाशिकच्या मालेगावमध्ये मतदार केंद्रावर दिव्यांगाची गैरसोय...

नाशिकच्या मालेगावमध्ये मतदार केंद्रावर दिव्यांगाची गैरसोय...

मतदान केंद्रावर व्हीलचेअर नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाचे हाल होत आहेत. व्हीलचेअरसाठी खर्च केला मात्र व्हीलचेअर कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

May 20, 2024 09:10 (IST)
Link Copied

पालघरमधील दातिवरे येथील ईव्हीएम मशीन दीड तासानंतर सुरू

पालघरमधील दातिवरे येथील ईव्हीएम मशीन दीड तासानंतर सुरू, आता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू

May 20, 2024 09:09 (IST)
Link Copied

ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे आवर्जुन मतदानाला हजर

May 20, 2024 09:07 (IST)
Link Copied

नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी EVM मशिनला हार घातला.

May 20, 2024 08:43 (IST)
Link Copied

महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला

`लोकशाहीचा उत्सव' असलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दिवे अंजूर येथील प्राथमिक शाळेतील बुथ क्र. 318 मध्ये महायुतीचे उमेदवार  कपिल पाटील यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

May 20, 2024 08:35 (IST)
Link Copied

देशातील प्रत्येक नागरिकावर मोठी जबाबदारी, मतदानासाठी घराबाहेर पडा - राजकुमार राव

May 20, 2024 08:29 (IST)
Link Copied

जान्हवी कपूरने मतदानाचा हक्क बजावला...

May 20, 2024 08:17 (IST)
Link Copied

अभिनेत्री जान्हवी कपूर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मतदान केंद्रावर दाखल

अभिनेत्री जान्हवी कपूर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मतदान केंद्रावर दाखल

May 20, 2024 08:11 (IST)
Link Copied

उत्तर मध्य मुंबईच्या मविआच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीसह मतदानाचा हक्क बजावला.

May 20, 2024 08:05 (IST)
Link Copied

पालघर तालुक्यातील EVM मशीन बंद पडल्याने मतदारांच्या रांगा

पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील दातिवरे येथे EVM मशीन बंद पडली असल्याची आहे. गेल्या एक तासापासून ही मशीन बंद असल्याने मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत. बुथ  क्रमांक 232 वरील EVM  मशीन बंद पडली आहे. 

May 20, 2024 08:00 (IST)
Link Copied

अभिनेता फरान अख्तर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मतदानाचा हक्क बजावला

अभिनेता फरान अख्तर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मतदानाचा हक्क बजावला

May 20, 2024 07:57 (IST)
Link Copied

उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचे मतदानापूर्वी औक्षण करण्यात आले.

उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचे मतदानापूर्वी औक्षण करण्यात आले.

May 20, 2024 07:52 (IST)
Link Copied

माजी मंत्री जयकुमार रावल यांनी कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून आम्ही देशासाठी लढत आहोत आणि लढत राहू असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन देखील यावेळी जयकुमार रावल यांनी केले.

May 20, 2024 07:47 (IST)
Link Copied

धुळ्यात EVM मशिन बंद झाल्याने मतदारांचा खोळंबा

धुळे शहरातील देवपूर मतदान केंद्र क्रमांक 29 एल एम सरदार हायस्कूल येथे गेल्या अर्ध्या तासापासून मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनच सुरू झालं नसल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. यामुळे नागरिक मतदान सुरू होण्याची वाट पाहत असून प्रशासनाकडून मतदान सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मकान प्रक्रिया लवकरच सुरळीत व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे मात्र अद्याप मतदान सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

May 20, 2024 07:42 (IST)
Link Copied

दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि नागरिकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं.

May 20, 2024 07:38 (IST)
Link Copied

अभिनेता अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता अक्षय कुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला. नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर येत आहेत, यंदाचं मतदान चांगलं होईल असा विश्वास अक्षय कुमार याने व्यक्त केला. 

May 20, 2024 07:14 (IST)
Link Copied

कपिल मोरेश्वर पाटील मतदानाला निघण्यापूर्वी पत्नीकडून औक्षण

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील  मतदानाला निघण्यापूर्वी पत्नी मीनल यांनी त्यांचे औक्षण केले.

May 20, 2024 07:11 (IST)
Link Copied

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना राबविण्यात आल्या असून दिव्यांग संचलित मतदान केंद्र सखी मतदान केंद्र आणि युवा संचलित मतदान केंद्र अशा विविध मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 1 हजार 967 मतदान केंद्र उभारण्यात आले असून धुळे शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात दिव्यांग संचलित मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांकडे बघून सर्वसामान्य नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. 

India Elections | Read Latest News on Lok Sabha Elections 2024 Live on NDTV.com. Get Election Schedule, information on candidates, in-depth ground reports and more - #ElectionsWithNDTV

Follow us: