नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule Municipal Election 2026: धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत आता थेट उमेदवारांना धमकावण्याचे प्रकार समोर आला आहे. धुळ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर हा प्रकार घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपचे खाते उघडले पण वादाची ठिणगी पडली
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मतदानापूर्वीच आपले खाते उघडले आहे. भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
मात्र, एकीकडे विजयाचा जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी इतर उमेदवारांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्या (शुक्रवार, 2 जानेवारी ) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
( नक्की वाचा : Sangli News : सांगलीत महायुतीमधील संघर्ष चिघळला, शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचं घर फोडलं? )
काय आहे आरोप?
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आकांक्षा बारसके निवडणूक लढवत आहेत. बारसके यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांना धमकावल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे निवडणूक रिंगणात असलेल्या इतर उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
( नक्की वाचा : Nashik-Solapur : नाशिक ते सोलापूर आता 'बुलेट' वेगाने; मोदी सरकारचा महाप्रकल्प, वाचा सर्व माहिती ! )
या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी तातडीने आकांक्षा बारसके यांचे घर गाठले. तिथे उपस्थित असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world