जाहिरात

Pune News: विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 'या' तारखेला मतदान, तर मतमोजणी...

आता आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Pune News: विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 'या' तारखेला मतदान, तर मतमोजणी...
  • महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • निवडणूक अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध होईल, उमेदवारी अर्ज १ जून २०२६ पर्यंत दाखल करता येतील
  • मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होईल, मतमोजणी २२ जून २०२६ रोजी होणार आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातल्या 16 स्थानिक स्वराज्य संस्थातून विधान परिषदेचे सदस्य निवडले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून 2026 आहे. अर्जांची छाननी 2 जून रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी 22 जून 2026 रोजी होणार असून 25 जूनपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने संबंधित प्रशासनाला आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, संबंधित स्थानिक संस्थांमध्ये किमान 75% स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि 75% मतदार असणे अनिवार्य आहे. यापूर्वी ही अट पूर्ण न झाल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. 

नक्की वाचा - Shocking Video: दादरमध्ये इडली बनवण्यासाठी शौचालयाचे पाणी? Video व्हायरल होताच मुंबईकरांमध्ये संतापाचा उद्रेक

आता महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) या अटींची पूर्तता झाल्याचा अहवाल दिल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, अहमदनगर, ठाणे, नाशिक, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड आणि यवतमाळ या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. या निवडणुकीत सोलापूरचे प्रशांत परिचारक, पुण्याचे अनिल भोसले, ठाण्याचे रवींद्र फाटक, नाशिकचे नरेंद्र दराडे आणि औरंगाबाद-जालनाचे अंबादास दानवे यांच्यासह 16 सदस्य निवृत्त झाले होते. त्या जागांवर ही निवडणूक होणार आहे. या जागा रिक्त झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारण तापले होते. आता आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

कोणत्या मतदार संघात निवडणूक होणार आहे आणि त्या ठिकाणी कोण आमदार निवृत्त झाले आहेत त्याच्या यादीवर एक नजर टाकूयात. 
 

  • सोलापूर (Solapur)    प्रशांत प्रभाकर परिचारक
  • अहमदनगर (Ahmednagar) अरुणकाका बाळभीमराव जगताप
  • ठाणे (Thane)    फाटक रवींद्र सदानंद
  • जळगाव (Jalgaon)    चंदूभाई व्ही. पटेल
  • सांगली-कोल्हापूर-सातारा (Sangli cum Satara)    कदम मोहनराव श्रीपती
  • नांदेड (Nanded)    अमरनाथ अनंतराव राजुरकर
  • यवतमाळ (Yavatmal) दुष्यंत सतीश चतुर्वेदी
  • पुणे (Pune)    अनिल शिवाजीराव भोसले
  • भंडारा-गोंदिया (Bhandara cum Gondia)    डॉ. परिणय रमेश फुके
  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Raigad-cum-Ratnagiri-cum-Sindhudurg)    अनिकेत सुनील तटकरे
  • नाशिक (Nashik)    नरेंद्र भिकाजी दराडे
  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली (Wardha-cum-Chandrapur-cum-Gadchiroli)    रामदास भगवानजी आंबटकर
  • अमरावती (Amravati) प्रवीण रामचंद्र पोटे
  • उस्मानाबाद-लातूर-बीड (Osmanabad-cum-Latur-cum-Beed)    धस सुरेश रामचंद्र
  • परभणी-हिंगोली (Parbhani-cum-Hingoli)    विप्लव गोपीकिशन बाजोरीया
  • औरंगाबाद-जालना (Aurangabad-cum-Jalna)    अंबादास एकनाथराव दानवे


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com