पुढचा मुख्यमंत्री कोण? थेट नाव सांगितलं, शिंदेंचा शिलेदार शेवटी बोललाच

शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री असणार हे सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्पात आहे. आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्याच महाविकास आघाडी आणि महायुती यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे अजून स्पष्ट झाले नाही. पण आता शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री असणार हे सांगितलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांनी भुवयाही उंचावल्या आहेत. पण खोतकर जे बोलत आहे तसं नक्की होणार का अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 200 जागा मिळतील असं माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार आहे असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे राज्यात महायुतीला पोषक वातावरण आहे असंही ते म्हणाले. लोकसभेत जे झालं ते विधानसभेत होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO

महायुतीला बहूमत मिळाल्यास एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महायुतीत वाद निर्माण होतो की काय अशी स्थिती आहे. महायुतीत मुख्यमंत्री कोण हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंसह अजित पवार हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहे. पण निकालानंतर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय घेतला जाईल असं महायुतीकडून सांगण्यात आलं आहे. अशा वेळी खोतकर यांनी शिंदेच मुख्यमंत्री होतील हे सांगितलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO

जालना विधानसभा मतदार संघातून अर्जुन खोतकर हे निवडणूक लढत आहेत. त्यांच्या समोर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे आव्हान आहे. खोतकर हे पैसे वाटत असल्याचा आरोप या आधी गोरंट्याल यांनी केला होता. त्यामुळे मतदार संघातील वातावरण तापलं होतं. मात्र गोरंट्याल यांच्या आरोपांना उत्तर देण्यास आपण बांधिल नाही असंही खोतकर यांनी स्पष्ट केले आहे. या मतदार संघात अटीतटीची लढत होत आहे. मागिल निवडणुकीत खोतकर यांना पराभव स्विकारावा लागला होता. 

Advertisement